रिपब्लिन सेना महासचिव प्रा.युवराज धसवाडीकर यांचा वाढदिवस लातुरात विविध कार्यक्रमांनी साजरा

 रिपब्लिन सेना महासचिव प्रा.युवराज धसवाडीकर

यांचा वाढदिवस लातुरात विविध कार्यक्रमांनी साजरा







लातूर- रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा.युवराज धसवाडीकर यांचा ५० वा वाढदिवस बुधवार,दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी कविसंमेलन,एकांकिका,सांस्कृतिक कार्यक्रम व डॉ.उषा धसवाडीकर लिखित लहर काव्यसंग्रहाचे रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या हस्ते प्रकाशनाने साजरा करण्यात आला.
प्रा.युवराज धसवाडीकर सुवर्ण महोत्सवी जन्मदिन समितीच्यावतीने बुधवार,दि.२१ सप्टेंबर रोजी दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह मार्केट यार्ड,लातूर  येथे प्रा.युवराज धसवाडीकर यांचा ५० वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यात डॉ.उषा धसवाडीकर यांच्या लहर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करुन,महाराष्ट्राचे ख्यातनाम भीमशाहीर स्मृतीशेष प्रतापसिंग बोदडे यांंना मरणोत्तर मानपत्र प्रदान करण्यात आले आणि त्यांचे सुपूत्र कुणाल बोदडे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम झाला. कवी रामदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन घेण्यात आले.यावेळी कल्याण वाघमारे दिग्दर्शित पार्टनर या मराठी एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. डॉ.संजय सांगवीकर व डॉ.दुष्यंत कटारे यांच्या प्रासंगिक सत्कारानंतर प्रा.युवराज धसवाडीकर यांचा विशेष सन्मान करुन अनेकांनी सदिच्छापर मनोगत व्यक्त केले.
सरदील आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला भंते पय्यानंद, रिपाब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्यासाहेब भालेराव, ऍड.गोविंद सिरसाट, कॉंगे्रसचे अभय साळुंके, भाजपाचे ऍड,शैलेश गोजमगुंडे, एमआयएमचे मोहसीन खान,वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्षा सुजाता अजनीकर, प्रा.बापू गायकवाड, प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्हापूरे आदि मान्यवरांनी उपस्थिती लावून प्रा.धसवाडीकरांना सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष पांडुरंग वाघमारे,कार्याध्यक्ष राम कोरडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, स्वागताध्यक्ष राजहंस धसवाडीकर, संयोजक ऍड.राहूल कांबळे,ऍड.लहू वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

أحدث أقدم