ताज सिनेमार्क मल्टीप्लेक्स रसिक प्रेक्षकांच्या सेवेत दाखल


ताज सिनेमार्क  मल्टीप्लेक्स रसिक प्रेक्षकांच्या सेवेत दाखल
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न



उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील पहिले मल्टीप्लेक्स थिएटर सिनेरसिक प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले आहे. शहरातील प्रसिद्ध जुन्या ताजमहल टॉकीजच्या जागेत ताज सिनेमार्क मल्टीप्लेक्स या नावाने भव्यदिव्य मल्टीप्लेक्स सुरू झाले असून नवनवीन चित्रपट भव्य स्क्रीनवर पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे. या चित्रपटगृहाचा उद्घाटन सोहळा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते  संपन्न झाला.

यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन गफार काझी, चित्रपट वितरक शौकत पठाण, सुहासभाई कोटेचा, जयेशभाई अग्रवाल, चित्रपटगृह चालक सुधीर कुलकर्णी, नवाब खान, आतिक खान, हैदर खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, उस्मानाबाद शहराच्या वैभवात भर घालणारे मल्टीप्लेक्स उभे राहिले, याचा आनंद होत आहे. आता उस्मानाबादकरांना सोलापूर, लातूरला जाण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

आमदार कैलास घाडगे पाटील यांनी उस्मानाबाद शहरात भव्यदिव्य मल्टीप्लेक्स सुरू झाल्याबद्दल चित्रपटगृह चालकांना शुभेच्छा दिल्या. मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन गफार काझी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकात मल्टीप्लेक्सचे चालक सुधीर कुलकर्णी यांनी मल्टीप्लेक्सच्या सोयीसुविधाची माहिती दिली. मल्टीप्लेक्समध्ये दोन स्क्रीन असून प्रेक्षकांना वेगवेगळे चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी ताज सिनेमार्क मल्टीप्लेक्सचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार ताज सिनेमार्क मल्टीप्लेक्सच्या वतीने करण्यात आला.  तर चित्रपटगृह उभारणी व सजावटीसाठी विशेष सहकार्य करणारे अजहर, अलताफ, नजीर यांचा सत्कार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ज्योती सुधीर पवार यांनी तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सुधीर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला उस्मानाबाद शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, चित्रपट रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्वात जुन्या ताजमहलचे मल्टीप्लेक्समध्ये रुपांतर
उस्मानाबाद शहरातील ताजमहल टॉकीज ही स्वातंत्र्यपूर्व काळात बांधण्यात आलेली आहे. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चित्रपटापासून इस्टमनकलर, सिनेमास्कोप अशा चित्रपटांची साक्षीदार असलेल्या या चित्रपटगृहाला अनेक नामांकित कलाकारांनीही भेट दिलेली आहे. आता सुसज्ज मल्टीप्लेक्समध्ये ताजमहल टॉकीजचे रुपांतर झाले आहे. एकाचवेळी वेगवेगळ्या चित्रपटांचा पर्याय सुद्धा प्रेक्षकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे


नवनवीन चित्रपट पाहण्याची संधी
उस्मानाबाद शहरामध्ये चित्रपट बघणार्‍या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. परंतु चित्रपट गृहांची कमतरता होती. त्यामुळे प्रेक्षकांना नवे चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी सोलापूर, लातूरला जावे लागत होते. ती उणीव आता ताज सिनेमार्क मल्टीप्लेक्समुळे दूर झालेली असून आपल्या शहरातच नवनवीन सिनेमे चित्रपट रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. अत्याधुनिक भव्य स्क्रीन, वातानुकूलीत आणि आरामदायी आसन व्यवस्था यामुळे हे मल्टीप्लेक्स प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे.

सिनेमार्कचे मराठवाड्यात सर्वत्र नेटवर्क
सिनेमार्कच्या वतीने मराठवाड्यात चित्रपट रसिकांसाठी भव्य मल्टीप्लेक्स सुरू करण्यात आलेले आहेत. बीड, अंबाजोगाईनंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना भव्य स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची संधी  उपलब्ध करुन देण्यात आलेली असल्याची माहिती यावेळी सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم