आत्मविश्‍वासाच्या बळावर जग जिंकण्याचे काम आपण सर्वांनी करावे-माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

आत्मविश्‍वासाच्या बळावर जग जिंकण्याचे काम आपण सर्वांनी करावे-माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर -जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेच्या माध्यमातून सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्याचे काम गेल्या 38 वर्षापासून सुरू आहे. शिक्षणातून विद्यार्थी सत्पुरूष घडला पाहिजे. ही भूमिका लक्षात घेवून गेल्या 20 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेले आहेत. आई-वडिलांनी तूम्हालाही शाळेत पाठविलेले आहे. ते संस्कारक्षम, सुसंस्कारीत व गुणवत्तावान विद्यार्थी निर्माण व्हावेत यासाठीच त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीची जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे. त्यामुळे उच्चशिक्षीत होवून डॉक्टर, इंजिनियर, संशोधक बनून आपण सर्वांनी मिळून आत्मविश्‍वासाच्या बळावर जग जिंकण्याचे काम सर्वांनी करावे असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्यावतीने आयोजित “युवा पिढी व भारतीय संस्कार” या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी दयानंद महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ.चंदेश्‍वर शास्त्रीजी, जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कॅम्पस प्रमुख प्रमोद लोळगे, प्राचार्य डॉ.सच्चिदानंद जोशी, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य संदिप पांचाळ, उपप्राचार्य डॉ.आशा जोशी, अरून शिरूरे, आर्य सर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, सध्या भोंदू साधुंचे प्रमाण वाढलेले आहे. परवाच एकावर गुन्हा दाखल झालेला आहे. राष्ट्रसंत मुरारी बापू म्हणतात की, ज्यांचे आचार, विचार, आहार आणि अंगतविहार शुद्ध असेल तोच खरा साधू. संस्कृती आणि विचारातून चांगले विद्यार्थी निर्माण होतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तरी चालेल, एखाद्या युनिटचा निकाला कमी लागला तरी चालेल परंतु त्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या विचारातून चांगलेपणाची स्पर्धा आपण निर्माण करून आणि यातून आपले आई-वडील व जेएसपीएम संस्थेेचे नावलौकीक करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यकमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सायबर ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या, राष्ट्रीय स्तरावरील अर्थ साक्षरता स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या 33 विद्यार्थ्यांचा, राष्ट्रीय अश-ते-डू मर्दानी अखाडा स्पर्धा, बॅडमिंटन, हॉकी, फूटबॉल स्पर्धेसह राष्ट्रीय पींच्याक सिलॅट मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दूलगालीब शेख यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ.सच्चिदानंद जोशी यांनी मानले.
समाजाला नवी दिशा देण्याचे क्रांतीकारी कार्य महात्मा बसवेश्‍वरांनी केले
महान समाजसुधारक, परिवर्तनवादी महात्मा बसवेश्‍वरांनी 12 व्या शतकामध्ये जातीभेद, धर्मभेद व लिंगभेदाच्या विरूध्द परिवर्तन घडविण्याचे कार्य केले. यासाठी त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना करून देशातील पहिल्या पार्लमेंट अनुभव मंडपाची स्थापना केली. त्याद्वारे चुकीच्या रूढी प्रथेविरूध्द निर्णय घेवून स्त्रीयांना सन्मान व अधिकार दिला, तसेच चांभार व ब्राम्हण मुलां-मुलींच लग्‍न लावून देवून समाजाला नवी दिशा देण्याचे क्रांतीकारी कार्य महात्मा बसवेश्‍वरांनी त्या काळी केले. त्याच विचारावर वाटचाल करून आधुनिक युगामध्ये आपणही क्रांतीकारी कार्य करावे असे आवाहनही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.


आई ही एकमेव संस्कार केंद्र आहे - प्रा.डॉ.चंदेश्‍वर शास्त्री
पूर्वीच्या काळामध्ये ब्राम्हण, क्षेत्रीय व शुद्र, वैष्य या समाजाला गुरूकूलच्या माध्यमातून संस्कार देण्याचे काम केले जात होते. या माध्यमातून वेद आणि उपनिषदांचे मार्गदर्शन केले जायचे.त्यामुळे  चांगले संस्कार होत होते परंतु सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपल्या मुलावर संस्कार करण्यासाठी आपण कमी पडत आहोत. काही वेळा मुलं कोणाचेही ऐकत नाहीत. पंरतु आई ही एकमेव संस्कार केंद्र आहे. त्या संस्कारातून पिढी घडविण्याचे काम केले जाते. त्यामुळे तेच संस्काराचे विचार आत्मसात करून आपण सर्वांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये सक्षमपणे वाटचाल करावी असे प्रतिपादन दयांनद महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख प्रा.डॉ.चंदेश्‍वर शास्त्रीजी यांनी केले.

घराप्रमाणे शाळेतही वातावरण राहील यासाठी प्रयत्नशील रहावे -अजितसिंह पाटील कव्हेकर
आपण जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे प्रयत्न करतो. परंतु यासाठी संस्थेच्या मुल्यांमध्ये बदल करण्याची गरज आहे. एक दिवसाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल घरणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकामध्येही बदल होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आपण सांगितले की, मोठ्यांचा आदर करा, त्यांच्याशी सन्मानाने वागा. ते वागतील परंतु ते विद्यार्थ्यांमध्ये कायम रूजविन्याचे काम शिक्षकांनी करावे आणि आपल्या घराप्रमाणेच शाळेतील वातावरण हे कायम उत्साहवर्धक व प्रेरणादायी राहील, यासाठी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم