श्री त्रिपुरा महाविद्यालयाच्या प्राचार्या सुलक्षणा केवळराम यांचा सन्मान

 श्री त्रिपुरा महाविद्यालयाच्या प्राचार्या

    सुलक्षणा केवळराम यांचा सन्मान






लातूर : येथील श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, लातूरच्या प्राचार्या सौ. सुलक्षणा शिवरुद्रप्पा केवळराम
यांचा मराठी प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (चला हवा येऊ द्या फेम) यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. 22 सप्टेंबर 2022
रोजी दुपारी 12 वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे सन्मान कर्तबगार महिलांचा या कार्यक्रमात यथोचित
सन्मान करण्यात आला.
नारी शक्तीचा सन्मान करणारी आपली संस्कृती आहे. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या तीन शक्तींना अनन्यसाधारण
महत्व आहे. देशाच्या विकासासाठी अनेक कर्तबगार महिलांनी वाटा उचलला आहे. महाराष्ट्र तर पुरोगामी विचारांची
भूमी म्हणून ओळखला जातो. अहिल्यादेवी, जिजामाता, सावित्रीबाई, रमाबाई अशा कितीतरी महान महिलांनी स्त्री
जन्माला मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. महिलादिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शिक्षण, समाजसेवा, कला,
क्रीडा, साहित्य, आरोग्य अर्थकारण, समाजकारण, राजकारण, बांधकाम, उद्योग आदी क्षेत्रात नाविण्यपूर्ण काम
करणार्‍या कर्तबगार महिलांवर प्रकाशझोत टाकून सर्व कर्तबगार महिलांच्या कार्याची प्रेरणा इतरांनाही मिळते. प्राचार्या
सौ. सुलक्षणा शिवरुद्रप्पा केवळराम यांच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सन्मान
करण्यात आला.
याबद्दल महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव, उपाध्यक्षा सौ. शोभा होनराव, कार्यकारी संचालक प्रा.
ओंकार होनराव, सहसचिव बालाजी होनराव, कोषाध्यक्षा प्रा. प्रेरणा होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा.
मनोहर कबाडे, श्रीकृष्ण जाधव, ज्ञानेश्वर पुरी, दीपक होनराव, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم