व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य


 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

 जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य

 

उस्मानाबाद- व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

 जिल्हयातील 2022-23 शैक्षणिक वर्षात जात प्रमाणपत्र अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला नाही. अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जात वैधता करणे बाबतचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून त्याची प्रत मूळ कागदपत्रासह येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयात दाखल करावेत असे  आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती  डॉ.बी.जी. पवार यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم