माजी मंत्री आ.देशमुख यांच्या हस्तेश्री सिद्धिविनायक युवक गणेश मंडळव संत गोरोबा सोसायटीच्या श्री गणेशाची आरती

माजी मंत्री आ.देशमुख यांच्या हस्ते

श्री सिद्धिविनायक युवक गणेश मंडळ

व संत गोरोबा सोसायटीच्या श्री गणेशाची आरती



लातूर प्रतिनिधी :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील श्री सिद्धिविनायक युवक गणेश मंडळ संत गोरोबा सोसायटीच्या श्री गणेशाची पूजा व आरती करण्यात आली यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगरसेविका वर्षा दत्ता मस्के, युनुस मोमीन, महेश काळे, काँग्रेस कार्यकर्ते तथा संत गोरोबा सोसायटी लातूरचे चेअरमन विकास कांबळे, सुमित खंडागळे, लोकनाट्य अध्यक्ष महादू रसाळ,  नीरज भैया गोजमगुंडे, राजेंद्र लोंढे, अजय आडगळे, गणपती मंडळ अध्यक्ष पवन सूर्यवंशी, रवी मस्के, विनोद क्षीरसागर, बालाजी कांबळे, भगवान कांबळे, देवदास गायकवाड, बालाजी सगट, विशंभर सूर्यवंशी, महेश हनमंते, पवन कांबळे, करण कांबळे, अजय रणदिवे, मनोज पवार, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूरच्या पूर्व भागामध्ये संत गोरोबा सोसायटीच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणरायाची आरती करण्यासाठी मला बोलवले याचा मला आनंद आहे. कोरोनामुळे गेली काही वर्ष आपल्याला सणासाठी बाहेर पडता येत नव्हते, आज आपण सर्वांनी कोरोनाला लढा दिल्याने कोरोना आज नाहीसा होत आहे. रूढी परंपरेनुसार आता आपण गणेशोत्सव साजरा करत आहोत, याबद्दल मी विकास कांबळे व सहकाऱ्यांचे कौतुक करतो. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. संत गोरोबा सोसायटी गृहनिर्माण संस्थेचे एक वेगळेपण आहे. माझ्या सहकाऱ्यांना जनतेने प्रेम पाठबळ आशीर्वाद द्यावेत ज्या तळमळीने ते सेवा करत आहेत त्यामुळे ते भविष्यात लातूरकरांची सेवा करतील. काँग्रेस कार्यकर्ते विकास कांबळे सारखी चांगली माणसे सेवा कार्यासाठी पुढे येतात त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे लातूरकरांना अभिप्रेत असेल असे समाजकारण धर्मकारण राजकारण आम्ही करतो असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकनेते विलासराव देशमुख यांनी संत गोरोबा सोसायटी गृहनिर्माण संस्थेचा पाया रचला दिवसभर कष्ट करून उपजीविका भागवणारे तुम्ही येथील कष्टकरी लोक आहात तुमचे भवितव्य उज्वल राहील असे सांगून त्यांनी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते विकास कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त  केले.

Post a Comment

أحدث أقدم