बीएलओ यांच्या मार्फत मतदार यादी तपशीलाशी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे -जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी.

बीएलओ यांच्या मार्फत मतदार यादी तपशीलाशी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे                  

                     -जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  पृथ्वीराज बी.पी.

         लातूर-मा. भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेव्दारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 मध्ये सुधारण केल्या आहेत. यामध्ये मतदार यादयातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहीत करणेबाबतच्या सुधारणा अंतर्भुत आहेत.

          या सुधारणांची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आलेली असून          दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती याचा आधार क्रमांक उपलब्ध्‍ करुन देऊ शकतो. लातूर जिल्ह्यात मतदार यादी व आधार प्रमाणीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे.

           मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार मतदार यादी व आधार प्रमाणीकरण कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग साध्य करण्याकरिता रविवार, दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी मासिक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील बीएलओ (BLO) यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार यादी घरोघरी जाऊन तपशिलाशी जास्तीत जास्त मतदारांचे आधार प्रमाणीकरण करणेबाबत आदेशीत करण्यात आले आहे.

           त्यानुसार लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सदर कार्यकमांतर्गत  वोटर हेल्पलाईन ॲप (Voter Helpline App) या मोबाईल ॲपव्दारे किंवा https:/www.nvsp.in व voterportal.eci.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन स्वत:मतदार यादी तपशीलाशी जास्तीत जास्त मतदारांचे आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे अथवा रविवार, दि. 11 सप्टेंबर 2022 रोजी आयोजीत मासिक विशेष शिबिरामध्ये मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ (BLO) यांचे मार्फत मतदार यादी तपशीलाशी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.


Post a Comment

أحدث أقدم