मतदार यादी मधील दुबार व बोगस नावे वगळण्यासाठी नांदगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण

मतदार यादी मधील दुबार व बोगस नावे वगळण्यासाठी नांदगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण 

उपोषणाचा तिसरा दिवस; प्रशासनाचे दुर्लक्ष

लातूर (प्रतिनिधी) : मौजे नांदगाव ता.जि.लातूर येथील ग्रामपंचायत मतदार यादीमध्ये नांदगावचे रहिवाशी नसताना केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी बाहेरगावातील 300 लोकांची नावे मतदार यादीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या संगनमताने नोंदविण्यात आलेली आहेत. सदरील दुबार व बोगस नावे तात्काळ वगळण्यात यावीत व आदी मागण्यासाठी  गेली तिन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण चालू आहे. 

मागील 5 वर्षा पासून तहसीलदार यांना वारंवार निवेदन देवुन दुबार नाव असलेल्या मतदार याद्याचे पुरावे देवुन पण त्याची नावे कामी झाली नाहीत. तसेच गावातील लग्न होवुन 40 ते 45 वर्षे झालेल्या मुलींची नावे पुन्हा मतदार यादीमध्ये समाविष्ठ कारण्यात आली आहेत, 18 वर्षे वय पूर्ण नसलेल्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

पुर्वीची 200 नावे पुरावे देवुनपण वगळण्यात आली नाहीत. नविन 150 नावे बी एल ओ, ग्रामसेवक BLO नायब तहसीलदार यांच्या मदतीने गावचे सरपंच यांनी मतदार यादीमध्ये बाहेरगावातील नावे नोंदविले आहेत. तरी जोपर्यंत मतदार यादीतील दुबार नावे वगळली जात नाहीत व नविन नोंदविण्यात आलेली नावे रद्द होत नाहीत तो पर्यंत ग्रामपंचायत निवडणुक घेण्यात येवु नये. जर ही मतदार यादी ग्राह्य धरुन निवडणूक घेण्यात येत असेल तर संपूर्ण गावचा या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल.


Post a Comment

أحدث أقدم