धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा संपन्न

धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा संपन्न 







औसा प्रतिनिधी -श्री धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळ संभाजीनगर औसा यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आली होती या चित्रकला स्पर्धेमध्ये दोन गट पाडण्यात आले होते.एक गट लहान गट व मोठा गट असा या मंडळांनी विभागणी केली होती. लहान गटांमध्ये प्रथम आलेला शिंदे आरुष सुमित,द्वितीय वैष्णवी सचिन सिंग बायसठाकूर, उत्तेजनार्थ रूपाली सहदेव बनसोडे व मोठ्या गटांमध्ये प्रथम आलेला नलगे समर्थ, द्वितीय मोरे अर्जुन दादाराव, उत्तेजनार्थ शिंदे अमृता हनुमंत या विद्यार्थ्यांना गणेश मंडळाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले.




या रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन श्री धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळाचे अध्यक्ष भरत शिंदे, उपाध्यक्ष सुमित जाधव, सचिव आशिष पवार,जितेंद्र गोमदे, सदस्य अनिकेत शिंदे, समाधान मोरे,किरण भडके, आकाश पाटील, रवी भडके,गुणाजी पवार, दादा मोरे,गणेश नलगे,विठ्ठल जाधव, सागर भडके, ओम पाटील,सतीश पवार,विनोद शिंदे, अमर जाधव, सहदेव मोरे, तसेच छत्रपती संभाजी राजे मित्र मंडळ संभाजीनगर औसा यांचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर औसा शहरातील सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गणेश मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी श्री धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळ व धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ संभाजीनगर यांच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतला.

Post a Comment

أحدث أقدم