महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ.श्रीकांत गायकवाड तर उपप्राचार्यपदी डॉ.राजकुमार लखादिवे यांची नियुक्ती

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ.श्रीकांत गायकवाड तर उपप्राचार्यपदी डॉ.राजकुमार लखादिवे यांची नियुक्ती



लातूर -येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा सामाजिक विचारवंत डॉ.श्रीकांत गायकवाड तर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.राजकुमार लखादिवे यांची उपप्राचार्यपदी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शिवशंकरप्पा बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा.मन्मथप्पा लोखंडे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, कार्यकारी संचालक ॲड.काशिनाथ साखरे, संचालक अशोकप्पा उपासे आणि ॲड.धनंजय मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.श्रीकांत गायकवाड आणि डॉ.राजकुमार लखादिवे यांनी यापूर्वी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्य केले आहे. तसेच आज महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पदवीव्युत्तर विभाग, एन.एस.एस., एन.सी.सी., क्रीडा विभागातील प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, जुक्टा, स्वामुक्टा पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, ग्रंथालयातील कर्मचारी यांनीही त्यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले आणि पूढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.      
यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अभिमन्यू रासूरे, संचालक शिवशंकरप्पा खानापुरे, ज्येष्ठ संचालक श्रीकांतप्पा उटगे, संचालक बसवेश्वर बिडवे, संचालक शिवप्पा अंकलकोटे, संचालक अशोकप्पा उपासे, संचालक डॉ.महेश हाळगे, संचालक श्याम आलुरे, संचालक राजेश्वर पाटील आणि संचालक प्रा.जी.एम.धाराशीवे आदि सर्व सन्माननीय संस्था पदाधिकाऱ्यांनी, विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक आणि  शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم