नळपट्टीच्या बिलातील सावळा गोंधळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन-अजितसिंह पाटील कव्हेकर

   नळपट्टीच्या बिलातील सावळा गोंधळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन-अजितसिंह पाटील कव्हेक


लातूर -लातूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून काही दिवसापूर्वी शहरवासीयांना नळपट्टीची बिले देण्यात आली असून यामधून नळपट्टीच्या बिलाचा सावळा गोंधळ समोर आलेला आहे. काही नागरिकांना नळ कनेक्शन नसतानाही नळपट्टीची बिले, काही नागरिकांना वाढीव नळपट्टीची बिले, बील भरले असतानाही थकबाकी व त्यावर व्याज आकारणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे या महानगरपालिकेकडून येणार्‍या नळपट्टी बिलाची सखोल चौकशी करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्‍त अमन मित्तल यांना देण्यात आले.
लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या नळपट्टीच्या बिलाबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 7770014305 हा मोबाईल क्रमांक देवून तक्रार निवारण करण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु याही विधायक प्रयोगाला यश मिळाले नाही. परिणामी नळपट्टीबाबत नागरिकांच्या समस्या वाढतच आहेत. त्यामुळे लातूर महानगरपालिकेचे आयुक्‍त अमन मित्तल यांनी नळपट्टीच्या बिलाबाबत सखोल चौकशी करून यातील दोषी कर्मचार्‍यावर तात्काळ कार्यवाही करावी यातून लातूरकरांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास थांबवावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्च्याच्या माध्यमातून भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे मनपा आयुक्‍तांना देण्यात आलेला आहे. यावेळी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्यासह अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोषसिंह ठाकूर, गजेंद्र बोकन, अ‍ॅड.पंकज देशपांडे, आकाश म्हसाने, वैभव डोंगरे,  रविशंकर लवटे, अ‍ॅड.किशोर शिंदे, गुलजिसिंह जुन्‍नी,नितीन लोखंडे, संतोष तिवारी, दूर्गेश चव्हाण, सचिन जाधव, ईश्‍वर सातपूते, महादेव पिटले, मयुरेश उपाडे, योगेश गंगणे, मंदार कुलकर्णी, पंकज शिंदे, चैतन्य फिस्के, ऋषिकेश क्षिरसागर, सय्यद आवेज,  संतोष बनसोडे, आदित्य फफागिरे  यांच्यासह लातूर शहर जिल्हा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم