मोदीच्या विचाराने आणि अमित शाहच्या शिकवनीने गद्दारांना गद्दारी करण्यास भाग पाडले - आमदार कैलास घाडगे - पाटील

 मोदीच्या विचाराने आणि अमित शाहच्या शिकवनीने गद्दारांना 

गद्दारी करण्यास भाग पाडले - आमदार कैलास घाडगे - पाटील




धाराशिव (प्रतिनिधी) - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवनी प्रमाणे आम्ही का करत असल्याचे गद्दार सांगत आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे, दिघे साहेबांचे विचार गद्दारी शिवकत नाहीत. या गद्दारांना मोदीच्या विचाराने आणि अमित शाहच्या शिकवनीने गद्दारी करण्यास भाग पाडले असल्याचा घणाघात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी केला.शिवसेना धाराशिव तालुकाप्रमुख सतिश सोमानी यांच्या वतीने आज शहरातील पवनराजे कॉम्पलेक्स येथील समर्थ सभागृहात शिवसैनिकाच्या सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापीठावर माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, जिल्हा युवा अधिकारी अक्षय ढोबळे, कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, वाशी तालुकाप्रमुख विकास मोळवणे, जिल्हा बँकेचे संचालक देसाई आदिंची उपस्थिती होती. यावेळी आमदार कैलास घाडगे - पाटील हे बोलत होते.

पुढे बोलताना कैलास घाडगे - पाटील म्हणाले की, या सरकारने जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना अपुरी मदत केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५४ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र शासनाने तेवढी मदत केली नाही. जिल्ह्यातील कांही नेते केलेल्या कामाचेही श्रेय घेतात, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही याचेही श्रेय ते घेणार का असा सवालही त्यांना केला. मात्र, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना वस्तूस्थितीची जाणीव करुन दिली, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सततचा पाऊस, गोगलगाय, यॅलो मोझॅक सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी आपल्या गावातील नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचीत राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आपण या सरकारच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांना मदत मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. तसेच येणाऱ्या कांही दिवसातच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. धाराशिव तालुक्यातील सदस्य नोंदणीचे अर्ज यावेळी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाप्रमुख कैलास घाडगे - पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेयानंतर प्रास्ताविक करताना शिवसेना धाराशिव तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमानी म्हणाले की, मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेची स्थापना झाली. पण जे लोक शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले, त्यांनी सरड्यासारखे रंग बदलून शिवसेनेशी गद्दारी केली. पण संकटातही धाराशिव तालुक्याने शिवसेनेला साथ दिली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे ११०० शपथपत्र दिली तसेच ११ हजार सदस्य नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धाराशिव तालुक्यातील सदस्य नोंदणीसाठी परिश्रम घेणारे सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुखांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिवसेना कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, नितीन शेरखाने, युवासेना विभागीय सचिव तथा जिल्हा युवा अधिकारी अक्षय ढोबळे यांनीही मेळाव्यास मार्गदर्शन केलेयावेळी बोलताना माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे म्हणाले की, शिवसेना संकटात असताना धाराशिव जिल्हा हा शिवसेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. निष्ठा विकणारे नाही तर निष्ठा जपणारे या मेळाव्याला उपस्थित असल्याचे ते म्हणाले.

यावेळी तालुक्यातील मेंढा येथील उपसरपंच महादेव ढोरमारेग्रा. . सदस्य फुलचंद भगवान माळी, सांगवी येथील श्रीमंत चंद्रकांत पाटील, धनंजय बनसोडे, कमलाकर शिंदे, लासोना येथील आबाजी यादव, मंगेश बाबाहरी पाटील, धुत्ता येथील ग्रा. . सदस्य अमोल मस्के, युवराज पिंपरे, जिकर शेख, जितेंद्र शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या गळ्यात भगवे रुमाल घालून त्यांचे शिवसेनेत स्वागत केलेकार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमिर शेख यांनी केले. या मेळाव्यासाठी धाराशिव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार वैâलास घाडगे - पाटील यांनी धाराशिवकरांची मान उंचवण्याचे काम केले - मकरंद राजेनिंबाळकर सध्या शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ आहे. पण संघर्ष हा शिवसेनेसाठी कांही नविन नाही. आपला संघर्ष हा विकृत मानसिकतेसाबेत आहे. भाजपा ईडी, सीबीआय या सारख्या यंत्रणाचा वापर करुन विरोधकांना त्रास देवून, खोके देवून भाजपामध्ये प्रवेश घेत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या नावाला कलंक लावण्याचे काम कांही गद्दारांनी केले. मात्र, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहून धाराशिवकरांची मान उंचवण्याचे काम केले. भगवान के घर देर है अंधेर नही या म्हणी प्रमाणे या खोके सरकारने कितीही वेळकाढू पण केला तर कोर्टात शेवटी शिवसेनेचाच विजय होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले.

 

Post a Comment

أحدث أقدم