शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नांची पेरणी करा- सत्कारमुर्ती शिवलिंग नागापुरे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नांची पेरणी करा- सत्कारमुर्ती शिवलिंग नागापुरे






औसा-हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री शिवलिंग नागापुरे बोलत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत त्यांच्या आयुष्यातील अज्ञानरुपी अंधकार दूर करणारे आपण दूत  होऊ ,तसेच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्वप्नांची पेरणी करून भावी पिढी निर्माण करूयात असे मत त्यांनी व्यक्त केले. 
यावेळी  प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी लातूरे,  सत्कारमुर्ती  शिवलिंगजी नागापुरे ,  मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे  यावेळी व्यासपिठावर   उपस्थित होते. 
जनकल्याण निवासी विद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षी परिसरातील गुणवंत शिक्षकाचा सन्मान केला जातो. यावर्षी औसा तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवलिंग नागापुरे  व सौ. ज्योतीताई नागापुरे यांना  प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी लातूरे व उपाध्यक्षा डॉ.लिलाताई कर्वा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यालयातील शिक्षक व पर्यवेक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.  यावेळी उपाध्यक्ष डाॕ. लिलाताई कर्वा,मा.सहकार्यवाह उमेशजी सेलूकर,वसतिगृह समिती अध्यक्ष 
अनंतराव पाठक,शालेय समिती सदस्य अजय रेणापूरे,सतिश जाधव,वसतिगृह समिती सदस्य नरेद्र पाठक,प्र.अधीक्षक दत्ताभाऊ माने, व्यवस्थापक बाहूबली भस्मे उपस्थित होते. 
यावेळी सत्कारमुर्ती म्हणून बोलताना, आपल्या कामावर निष्ठा निर्माण झाल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही. तसेच स्वयंप्रेरणा ही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तसेच आयुष्यात झेप घ्यायचे असेल तर बाह्यरुपापेक्षा अंतररूपाकडे पहा आणि विद्यार्थ्यांना चांगल्या मित्रांच्या सहवासात राहून उत्तम पुस्तके वाचा आणि यशस्वी व्हा असे मत नागापुरे यांनी व्यक्त केले. 
अध्यक्षीय समारोप प्रकाश लातूरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वरजी सोनटक्के तर सुत्रसंचलन कु. प्रणोती संजय मोळवणे ( 8 वी) व कु. संस्कृती खंडेराव भातलवंडे (9 वी)यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार संस्कार मंडळ प्रमुख श्रीमती दाक्षायणी भालेकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم