आशा फुंदे-कराड यांना राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान

 आशा फुंदे-कराड यांना राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान




लातूर - माईर्स एमआयटी पुणे संचलित श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामेश्वरच्या संचालिका तथा विश्वशांती गुरुकुल येथील शिक्षिका श्रीमती आशा फुंदे-कराड यांना कै.ॲड. देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचारमंचच्या वतीने २०२२ चा राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक 11 सप्टेंबर रोजी श्री विद्यालय, लातूर या ठिकाणी विशेष कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.गोविंदराव घार आणि प्रसिद्ध व्याख्याते तथा साहित्यिक डॉ. राजशेखर सोलापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विचारमंचचे अध्यक्ष डॉ. संतोष जमदाडे हे होते. डॉ. संजय जमदाडे हे उपस्थित होते.

     आशा फुंदे-कराड या उत्तम कवयित्री असून त्या सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी असतात.ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी त्यांनी विविध कार्य केले आहे. तसेच स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी त्यांनी उपक्रम राबविले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन प्रा.विश्वनाथ कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड,मंगेश कराड,आ.रमेश कराड, डॉ.हनुमंत कराड, बालासाहेब कराड, राजेश कराड आणि सर्व सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم