राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिन कार्यक्रम;विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती

 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वर्धापन दिन कार्यक्रम;विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती






लातूर- माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वात गेली ३९ वर्षे कार्यरत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा शनिवार,दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी वर्धापन दिन असून तो विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी.के.मुरळीकर यांच्या अध्यक्षतेखाली,मराठवाडा उपाध्यक्ष एन.डी.शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत,जिल्हा कार्यकारिणीची,शासकीय विश्रामगृह,लातूर येथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली,यावेळी विविध पदाधिकार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकार्‍यांमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा युवक अध्यक्षः पवन बनसोडे, सोशल मिडीया जिल्हा प्रमुख नामदेव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काजळे, औसा तालुका कार्याध्यक्षः अनिल कांबळे यांचा समावेश असून,त्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा समाजोपयोगी उपक्रमांनी वर्धापन दिन साजरा करण्यासंदर्भात विचारविनीमय करण्यात आला.
सदरीला बैठकीला मराठवाडा उपाध्यक्ष एन.डी.शिंदे,मराठवाडा संघटक पांडुरंग शिवलीकर,जिल्हाध्यक्ष रवि कुरील,जिल्हा सचिव प्रा.लक्ष्मीकांत जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दामावले, खरटमोल,जिल्हा संघटक शंकर पवार,बालाजी शेरखाने, औसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, युवक शहराध्यक्ष आकाश दुर्गे ,गटई कामगार अध्यक्ष परमेश्वर कांबळे ,सचिन कांबळे सह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم