हैद्राबाद मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तस्वामी विवेकानंद विद्यालयात प्रा.राजशेखर सोलापूरे यांचे व्याख्यान

हैद्राबाद मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
स्वामी विवेकानंद विद्यालयात प्रा.राजशेखर सोलापूरे यांचे व्याख्यान





लातूर -जेएसपीएम शिक्षण संस्थेच्यावतीने हैद्राबाद मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेबर 2022 रोजी स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक सभागृह एमआयडीसी लातूर येथे सकाळी 10 वाजता ज्येष्ठ विचारवंत तथा प्रा.राजशेखर सोलापूरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मूर्गाप्पा काशीनाथराव खुमसे यांची उपस्थिती राहणार आहे. जेएसपीएम संस्थेच्या सविच सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जेएसपीएम संस्थेेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, जेएसपीएमचे कॅम्पस प्रमुख प्रमोद लोळगे यांची उपस्थिती राहणार आहे.
याच कार्यक्रमामध्ये स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जेएसपीएम परिवारातील पदाधिकारी, विविध विभागाचे प्रमुख कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेएसपीएम संस्थेचे प्रशासयकीय समन्वयक निळकंठराव पवार व सर्व विभागप्रमुखांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم