विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सवलत मिळावी,शिवलिंग नागापुरे यांची मागणी

विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन 
प्रवेश प्रक्रियेत सवलत मिळावी,शिवलिंग नागापुरे यांची मागणी





औसा (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण घेत असताना ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विज्ञान प्रदर्शनात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मजल मारलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अकरावी विज्ञान शाखा प्रवेशासाठी कांही जागा हक्काच्या असाव्यात यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भादा जिल्हा परिषद शाळेतील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विज्ञान विषयाचे शिक्षक शिवलिंग नागापुरे यांनी, औसा विधानसभेचे आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे केली आहे.

माध्यमिक शिक्षण घेत असताना कला, क्रीडा अशा स्पर्धेत सहभागी होवून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी कांही गुण देण्यात येतात व महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात होताना अशा विद्यार्थ्यांनाअकरावी प्रवेशासाठी आणि शासकीय सेवा भरतीत आरक्षण प्रक्रियेत स्थान देण्यात येते. याचप्रमाणे विज्ञान प्रदर्शनात सहभागी होवून राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर मजल मारलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येवून अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेत कांही जागा राखीव ठेवण्यात याव्यात अशी मागणी नागापुरे यांनी आमदार पवार यांच्याकडे केली. हा निर्णय होवून ही सवलत मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात सहभाग वाढेल व दर्जेदार विद्यार्थी घडतील , दर्जेदार संशोधन घडेल , विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण आणि प्रवेशासाठी काही जागा निश्चीत केल्यामुळे विद्यार्थ्याचा संशोधनाकडे कल वाढेल असे शिवलिंग नागपुरे यांनी सांगितले आहे.यासाठी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला जावा अशी अपेक्षा त्यांनी आमदार महोदयाकडे व्यकत केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم