“५३ महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी.लातूर करणार लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबियांचा गौरव”


५३ महाराष्ट्र बटालियन, एन.सी.सी.लातूर करणार लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबियांचा गौरव






लातूर -
५३ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (अमृत महोत्सव समिती व राष्ट्रीय छात्र सेना), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये स.११वा. “शहीदो को शत शत नमन” या उपक्रमाद्वारे उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील वीरता पदक पुरस्काराने शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.  
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांची उपस्थिती लाभणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत तथा इतिहासकार प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे, प्रमुख अतिथी म्हणून ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार, कॅप्टन दीपक कुमार, कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले आणि अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत गायकवाड यांची उपस्थिती लाभणार आहे.  
या कार्यक्रमांमध्ये देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीसह असलेले स्मृतीचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचे स्मरण करणे आणि समाजातील युवा पिढींना शहिदांच्या बलिदानाची आठवण करून देऊन त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
या कार्यक्रमाला ५३ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, लातूरचे सर्व अधिकारी, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व एनसीसी ऑफिसर, एनसीसी कॅडेट्स यांची उपस्थिती असणार आहे.  
या कार्यक्रमाला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मान्यवर, आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय आणि एनसीसी कॅडेटने उपस्थित राहण्याचे आवाहन ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूरचे लेफ्टनंट कर्नल संतोष कुमार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे, नायब सेबेदार दीलिप शेंडगे, संयोजन समिती सदस्य डॉ.  श्रीकांत गायकवाड, कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, डॉ.रत्नाकर बेडगे आणि डॉ.संजय गवई यांनी केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم