महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात कविता लेखन, निबंध लेखन आणि भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न

 महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात कविता लेखन, निबंध लेखन आणि भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न






लातूर-येथील महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त कविता लेखन, निबंध लेखन आणि भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड हे होते तर मुख्य अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, हिंदी विभागाध्यक्ष डॉ.मनोहर चपळे, उपप्राचार्य प्रा.एस.व्ही.पवार, पर्यवेक्षक प्रा.एस.आर.हावळे, प्रा.डी.आर.भुरे, वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा.दीपक बजाज व प्रा.शैलेश कानडे आणि डॉ.घन:श्याम ताडेवार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.मनोहर चपळे म्हणाले की हिंदी ही राष्ट्रीय गौरवाची राष्ट्र भाषा आहे. आज यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे असे ते म्हणाले.
यावेळी उपप्राचार्य प्रा.एस.व्ही.पवार यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले तर अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.टी.गायकवाड म्हणाले की, हिंदी भाषा जगातील दुसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषेमध्ये आपण भारतीय संवाद केले पाहिजे असे ते म्हणाले.
या स्पर्धेत एकूण ९० विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून कविता लेखन, निबंध लेखन आणि भाषण स्पर्धा अश्या तीन प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये हिंदी मेरी भाषा है, वृक्ष के उपकार, जल है तो कल है, राष्ट्रभाषा हिंदी, जय जवान जय किसान, वर्तमान शिक्षा पद्धती, १४ सितंबर : हिंदी दिवस, आजादी के ७५ वर्ष उपलब्धिया: और कमिया, आज की युवा पीढी और भारत का भविष्य आदि विषय ठेवण्यात आले होते.
कविता लेखनामध्ये बुलबुले श्रद्धा शिवलिंग प्रथम, कांबळे वैष्णवी जयद्रथ द्वितीय तर शेख तमन्णा इस्माईल हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.  
निबंध लेखनामध्ये राजगीरवाड अंजली प्रथम, सोनवणे अंबिका बबन द्वितीय तर माकोडे बालाजी प्रशांत याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
  भाषण स्पर्धेमध्ये साक्षी कुमार जाधव प्रथम, आगलावे संध्या किशोर द्वितीय तर विजय चक्रे याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
विजयी स्पर्धकाचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कल्पना गिराम यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी गिराम व विद्यार्थी ढगे दीपक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ.घनश्याम ताडेवार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ बोडके व बालाजी होनराव यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

أحدث أقدم