महात्मा बसवेश्वरचा संगीत चमू विद्यापीठीय विभागीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत सर्वद्वितीय

 महात्मा बसवेश्वरचा संगीत चमू विद्यापीठीय विभागीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत सर्वद्वितीय







लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित विभागीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत सर्व द्वितीय क्रमांक पटकविला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने विभागीय स्तरावर देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या विभागीय स्पर्धेत एकूण बारा संघांनी सहभाग नोंदविला. यात महात्मा
बसवेश्वर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे चमुने सर्वद्वितीय पटकावून महाविद्यालयाच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला आहे.
विजेत्या संघाला स्वामी रामानंद तीर्थ मराठा मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धवजी भोसले, प्र. कुलजोगेंद्रसिंह बेसन, उपसचिव पुणे सचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा विभाग संचालक डॉ. परिहार यांच्या शुभहस्ते रुपये सात हजार रक्कम प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरवण्यात आले. विजेत्या संघात स्पर्धक म्हणून कुमारी वाघमारे नम्रता कु. मुजावर मेहेक, कु. आगलावे  मीताली, कु. माळी ज्ञानेश्वरी, कु. मुळे अनघा, कु. मुखडे शिवाली, धम्मदीप सकपाळ, राहुल गडेराव, प्रा. विश्वनाथ स्वामी ( तबला वादक),   प्रा. गोविंद पवार (हार्मोनियम वादक), डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. अश्विनी रोडे (संघ व्यवस्थापक) यांनी सहभाग घेतला.
त्यांच्या या यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शिवशंकरआप्पा बिडवे, सचिव मन्मथआप्पा लोखंडे, उपाध्यक्ष मा. माधवराव पाटील तपसेचिंचोलीकर, प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांच्या शुभहस्ते शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. यशवंत वळवी, डॉ. जे. एच. देशमुख, डॉ. दिनेश मौने, प्रा. विजयकुमार धायगुडे, डॉ. शीतल येरूळे, डॉ. अवस्थी, डॉ. कडगे, प्रा.  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विजेत्या संघाला शुभेच्छा देऊन विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم