ऑल इंडिया लिनेस क्‍लब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्या विदर्भ, खानदेश दौर्‍यातून लिनेस क्‍लबला मार्गदर्शन

ऑल इंडिया लिनेस क्‍लब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट प्रतिभाताई पाटील
 कव्हेकर यांच्या विदर्भ, खानदेश दौर्‍यातून लिनेस क्‍लबला मार्गदर्शन





लातूर -ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5, हिरकणी या क्‍लबच्या प्रांतपाल सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी नुकताच विदर्भ खानदेश दौरा काढून या भागातील जळगाव, औरंगाबाद, अमळनेर, अकोला, खामगाव, शेगाव, नंदूरबार, नांदूरा येथील लिनेस क्‍लबना भेटी देवून त्यांनी उभारलेल्या लघुउद्योगांचे कौतुक केले. तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून लिनेस क्‍लबचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी काढलेला हा दौरा इतर लिनेस क्‍लबसाठी स्फूर्तीदायी व प्रेरणादायी ठरणारा आहे.
यावेळी त्यांच्या समवेत रिझन चेअरपर्सन-1 लि.सुलभा देशपांडे, रिझन चेअरपर्सन लि.कमल बरूळे, डिस्ट्रिक्टच्या माजी प्रांताध्यक्षा लि.लता बनवट, लि.ज्योती चरखा, पीडीपी लि.बिना चावला, पीडीपी लि.मालानी, पीडीपी लि.डॉ.भारती वर्मा, डिस्ट्रिक्टच्या माजी मल्टिपल अध्यक्षा लि.सुनिला नरप्पनवार, मल्टिपलच्या सके्रेटरी-टे्रझर डिस्ट्रिक्टच्या सचिव लि.अर्चना नलावडे, पीडीपी लि.आशा वाळवी, लि.साधना पळसकर, लि.उमा मिरजगावे, औरंगाबादच्या लि.अग्रवाल, पीडीपी लि.तेजल चौधरी, पीडीपी लि.तारा माहेश्‍वरी, पीडीपी लि.उषा बाहेती, पीडीपी लि.आशा विरानी, लि.सुनंदा गुप्‍ता, जळगावच्या अध्यक्षा लि.दर्शना नलवानी, शेगाव अध्यक्षा लि.दिप्‍ती गोयंका, अकोला अध्यक्षा लि.सुलेखा गुप्‍ता, नंदूरबार अध्यक्षा लि.सुप्रिया कोतवाल, खामगाव अध्यक्षा लि.हरप्रित बग्गा, शिरपूर अध्यक्षा लि.नलिनी राठी, नांदूराच्या अध्यक्षा लि.शहा, अमळनेरच्या अध्यक्षा लि.शारदा अग्रवाल आदीसह लिनेस मान्यवरांची उपस्थिती होती.  यावेळी ऑल इंडिया लिनेस क्‍लब एमएच-5 हिरकणी 2022 च्या प्रांतपाल सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी सर्व लिनेस क्‍लबच्या पदाधिकार्‍यांना सविस्तर मार्गदर्शन करून लिनेस क्‍लबची पुढील दिशा विषद केली.
या विदर्भ खानदेश दौर्‍यामध्ये जळगाव येथील उपक्रमामध्ये दहा व्हिलचेअर व सात शिलाई मशीनचे वाटप गरजू व होतकरू महिलांना करण्यात आले. तसेच शेगाव येथे ग्रंथालय सुरू करण्यात आले. याबरोबरच गोरगरीबांना गाद्याचे वाटप, अन्‍नदान, कपडे व इतर सुविधा देण्यात आल्या. अकोला येथील कार्यक्रमात श्रवणयंत्राचे वाटप, अन्‍नसेवेच्या कीट व इतर उपक्रम राबविण्यात आले .



तर खामगाव येथील उपक्रमामध्ये चार व्हिलचेअर, शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना शुज व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.  लिनेस क्‍लबच्या उपक्रमात विदर्भ, खानदेश लिनेस क्‍लबचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे तेथील लिनेस क्‍लबच्यावतीने ऑल इंडिया लिनेस क्‍लबच्या प्रांतपाल सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर व त्यांच्या टीमचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी या उपक्रमाला जळगाव औरंगाबाद, अमळनेर, अकोला, खामगाव, नंदूरबार, नांदूरा, शेगाव येथील लिनेस क्‍लबच्या पदाधिकार्‍यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Post a Comment

أحدث أقدم