प्राचार्य डॉ राम वाघ यांचा सेवा गौरव सन्मान

 प्राचार्य डॉ राम वाघ यांचा सेवा गौरव सन्मान



लातूर (प्रतिनिधी) नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, बाभळगाव येथील कै. व्यंकटरावजी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम वाघ हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवा गौरव सन्मान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाने लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृह सन्मान पूर्वक सपत्नीक सत्कार  दयानंद महाविघालयाचे प्राचार्य डॉ शिवाजीराव गायकवाड आणि समाजशास्ञ अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो डाँ नारायण कांबळे यांच्या शुभहस्ते केला या सेवा गौरव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा डॉ नारायण कांबळे होते तर प्रमुख उपस्थित प्राचार्य डॉ शिवाजीराव गायकवाड ( लातूर ), माजी प्राचार्य डॉ सुरेश वाघमारे, प्राचार्य डॉ बालाजी कांबळे, प्राचार्य डॉ संजय वाघमारे, प्रो डॉ वेदप्रकाश मलवाडे, प्रा डॉ अशोक मोटे, डॉ बळीराम पवार, आदि मान्यवर व्यासपीठावर होते.

या सेवागौरव समारंभांचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ शिवाजीराव गायकवाड यांनी केले यानंतर समायोचित मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ राम वाघ यांनी गेल्या ४० वर्षात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखणीय कार्य केलेल्या  योगदानाचे  कौतुक करत सेवाभावी वृत्तीच्या प्राचार्य डॉ राम वाघ आणि त्याच्या पत्नीस  उदंड निरोगी आरोग्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ राम वाघ यांनी कृतज्ञता व्यक्त केली यानंतर अध्यक्षीय समारोप प्रो. डॉ नारायण कांबळे यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ अंगद कोते तर शेवटी आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सतिश ससाने यांनी मानले मोठ्या संख्येने प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم