गणेश उत्सवातील स्पर्धांचे पारितोषिक वितरण

गणेश उत्सवातील स्पर्धांचे पारितोषिक वितरण




लातूर,प्रतिनिधी-शहरातील, अंबाजोगाई रोड परिसरातील रिद्धी गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी  गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंडळाच्या वतीने गणेश उत्सवा दरम्यान महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तर मुलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, लंगडी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे असून, महिलांच्या रांगोळी स्पर्धेत सौ.समृद्धी देशपांडे (प्रथम) तर नेहा मोरे (द्वितीय). संगीत खुर्ची-  आयुष चाटे, ऋषिकेश गेजगे, स्वरा देशपांडे, अनुजा जाधव (प्रथम) तर नियती अष्टेकर, अभिलाष चाटे, सेजल मिसाळ, निकिता चिगुरे (द्वितीय). लिंबू चमचा स्पर्धा -संचिता सूर्यवंशी, शौनक देशपांडे, स्वरा देशपांडे (प्रथम) तर श्रेयश जाधव, श्रेयश हेरकर, श्रावणी हेरकर (द्वितीय). लंगडी स्पर्धा - संचिता सूर्यवंशी, निकिता चिगुरे, आशिष गेजगे, प्रथमेश मोहाळे (प्रथम) तर आयुष चाटे, सिद्धी कुंभारे, अमर बचाटे, यश रोंगे (द्वितीय). रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणुन राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचा शिक्षिका सौ सरिता खंडेलवाल यांनी काम पाहिल्या. 
विजेत्या स्पर्धकांना शुक्रवारी आयोजित समारंभात श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग शितोळे व शिवाजी महाविद्यालय, रेणापूर येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. राजाराम जाधव यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत हेरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमाशंकर डोलारे, सुहास देशपांडे, सुनील फड, संतोष गेजगे, श्रीकांत चाटे, श्रीमंत जाधव, शाशिकिरण सुरवसे,  देवा अष्टेकर, महेश मोरे,अशोक पाटील,  सौ अश्विनी पाटील, सौ. मोहाळे, सौ.ज्योती अष्टेकर, सौ.बालिका बचाटे, सौ. सोनाली फड, सौ.आशा जाधव, सौ.राधिका कार्ले, सौ.देवई गेजगे. सौ. हेरकर मॅडम, सौ सिंधू सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم