मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न


औसा:- देशाचे आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे या निमित्ताने तहसील कार्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार भरत सूर्यवंशी तर उदघाटक म्हणून उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे हे उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, विस्तार अधिकारी राम कापसे याची उपस्थिती होती .यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या चिमुकल्या स्पर्धकांचे कौतुक केले आहे आज कोरोना काळानंतर प्रथम विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहेत गावाखेड्यातिळ ल लहान चिमुकल्याला स्वतः च्या अंगी असलेले गुणांना सादर करताना उत्साह मोठा असून अश्याच स्पर्धेतून भविष्यात नक्कीच कलाकार निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला आहे तर सध्याला देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी घेतलेल्या कष्ट त्याग बलिदान आणि या संग्रामाच्या आठवणीला उजाळा नव्या पिढीला प्रेरणादायी नक्कीच ठरणार असल्याचे मत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे 

तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत तालुक्यातील 65 शाळांतील 285 कलाकार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कलाविष्कार सादर केला आहे सदरील कार्यक्रमात देशभक्तीपर गीतावर समूह नृत्याविष्कार सादर केला आहे एकंदरीत मुक्तेश्वर मंदिराच्या आवारात देशभक्तीचा वातावरण निर्माण झाले होते यावेळी चार विभागात स्पर्धा घेण्यात आल्या यशस्वी स्पर्धकांना तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर पवार, गटविकास अधिकारी पाटील गटशिक्षाधिकारी अनुपमा भंडारी याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم