वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्याने औशात राष्ट्रवादी विद्यार्थीकाँग्रेस तर्फे निषेध

वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्याने  औशात राष्ट्रवादी विद्यार्थीकाँग्रेस तर्फे  निषेध


औसा /प्रतिनिधी  : - शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान शेख, मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष ॲड. मुस्तफा (वकील) इनामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. शिवाजी सावंत, आशिष शेलार, मा. नगरसेवक गोविंद जाधव,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, माजी नगराध्यक्ष कीर्ती कांबळे, राष्ट्रवादी युवक  काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश टिके, वैशाली नारायणकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मत व्यक्त करीत म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने स्वार्थासाठी 2 लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातला भेट देऊन 2 लाख बेरोजगार तरुणांचा रोजगार हिरावून घेतला आहे. सामाजिक व राजकीयदृष्ट्या सगज होऊन या चुकीच्या निर्णयाचा विरोध केला पाहिजे. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने सरकारने यशस्वी पाठपुरावा केला होता. पण राज्यात नाट्यमयरित्या स्थापन झालेल्या शिंदे - फडणवीस सरकारने हा प्रकल्प मोदी - शहाना गिफ्ट देऊन उपकाराची फेड केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, सरकारी संस्थांचे होणारे खाजगीकरण, बेरोजगारी दिवसंदिवस  वाढत आहे, नोकर भरती नाही, सध्या महाराष्ट्रावर केंद्र व राज्य सरकारकडून औद्योगिक पिळवणूक होत आहे. राज्यात एकीकडे महागाईचा भडका उडाला असून त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यात आला आहे. 

Post a Comment

أحدث أقدم