मराठवाडया वरील अन्याय दूर करन्यासाठी सर्वाणी एकत्र येउन लढा उभारन्याची गरज-मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 मराठवाडया वरील अन्याय दूर करन्यासाठी सर्वाणी एकत्र येउन लढा उभारन्याची गरज-मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर








लातूर-निजामाच्या 229 वर्षाच्या जुलमी राजवटीला उलथूूण टाकुण स्वातंत्र्य सैनीक,स्वामी रामानंद तिर्थ, गोविंदभाई श्राफ, बाबासाहेब परांजपे, शेषेराव वाघमारे, सारख्या असंख्य क्रांती विराणी आपल्या बलीदानातून स्वातंत्र्य मिळवले, मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला. त्या वेळेसचे मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाडयाचे कौतूक करूण लोक संख्येच्या प्रमाणात आर्थीक निधी व शासकीय सेवेत घेण्याची घोषणा विधानसभा सभागृहात केली होती तरीही मराठवाडयाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मराठवाडयावरील अन्याय दूर करून न्याय मिळवन्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यानी व जनतेने एकसंघपणे लढा उभारावा लागेल असे अवाहन मा.आ.मराठवाडयाच्या विषयाचे अभ्यासक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. या वेळी स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील, डॉ.राजशेखर सोलापूरे,उपस्थीत होते.








पुढे बोलताना कव्हेकर साहेब म्हणाले मराठवाडयाच्या  अनुशेषासाठी आम्ही 1974 साली विद्यार्थी  लढा उभारला होता. त्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागले  होते. त्यानंतर शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री झाले मराठवाडयाचा अनुशेष आज 80 हजार कोटीचा आहे. वैधानिक विकास मंडळ  3 वर्षा पासुन बंद आहे. केंद्रानी महाराष्ट्राला दिलेल्या योजनेपैकी कांहीही मिळाले नाही. वॉटर ग्रीड योजना पुन्हा चालू करन्याची नितांत गरज असल्याचे कव्हेकर साहेब यांनी सांगीतले.
मुख्यमंत्र्याचे निमंत्रण सोडून कार्यक्रमाला आलो- खुमसे अप्पा
स्वातंत्र्य सेनानी श्री.मुर्गाप्पा खुमसेअप्पा यांचा मुक्‍ती संग्राम गौरव कार्यक्रमांच्या निमीत्‍ताणे शिवाजीराव  पाटील कव्हेकर साहेबाच्या शुभ हस्ते गौरव करन्यात आला या गौरव प्रसंगी बोलतांना श्री.मुर्गाप्पा खुमसे म्हणाले श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांना मी गेली अनेक वर्षे ओळखतो त्यांच्या सोबत अनेक लढयामध्ये मी सहभागी झालो आहे. त्यांचे कार्य विविध क्षेत्रामध्ये प्रेरणादाई आहे. म्हणून आज मला औरंगाबाद येथील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्याचे निमंत्रण होते ते सोडून जाणीव पूर्वक मी कव्हेकर साहेबांच्या कार्यक्रमाला आलो यावेळी खुमसे अप्पानी स्वातंत्र्य लढयातील अत्यंत प्रेरनादाई भावनीक गीत गाउन सर्वाची मने जिंकली यावेळी डॉ.राजशेखर सोलापूरे यांचे अभ्यासपूर्व भाषण झाले यावेळी डॉ.सतीष यादव, जेएसपीएम संस्थेचे संचालक निळकंठराव पवार,दिलीपराव पाटील,अप्पासाहेब पाटील, राजाभाउ मुळे, डॉ.जोशी व मोठया संख्येने नागरीक, पालक उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم