लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाने रविंद्रनाथ टागोर गार्डन विकसीत होणार-माजी मंत्री आमदार अमित देशमुख


लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाने रविंद्रनाथ टागोर गार्डन विकसीत होणार-माजी मंत्री आमदार अमित देशमुख



 

लातूर (प्रतिनिधी) : अत्यंत वेगाने विकसीत होत असलेल्या लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जवळपास ३ एकर जागेत २ कोटी ३१ लाख रूपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुवीधानियुक्त रविंद्रनाथ टागोर गार्डन विकसीत करण्यात येत असून या कामाची आज शनिवार दि. ३  सप्टेंबर रोजी सकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी  पाहणी केली. सदरील काम ठरवून दिलेल्या अराखडानुसार अत्यंत दर्जेदार पध्दतीने नियोजीत वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

शैक्षणिक, औदयोगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून मराठवाडयातील लातूर शहराचा अत्यंत जलद गतीने विकास होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने या शहराचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि पूढाकारातून विविध सोयीसुवीधा उभारण्यात येत आहेत. लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येत असलेले रविंद्रनाथ टागोर गार्डन त्यापैकीच एक आहे. लहानमुले, ज्येष्ठनागरीक यांच्यासह सर्वच वयोगटातील नागरीकासाठी एक विरंगुळयाचे ठिकाण म्हणून हे गार्डन विकसीत केले जात आहे.

लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजस्थान शाळेच्या पाठीमागे प्रभाग क्र. १६ मध्ये जवळपास ३ एकर जागेमध्ये सदरील रविेंद्रनाथ टागोर गार्डन विकसीत होत आहे. या एकूण कामावर २ कोटी ३१ लाख रूपये खर्च होणार आहे. पामकोर्टच्या धर्तीवर या गार्डनची उभारणी होत असून प्रारंभी सुंदर, आकर्षक प्रवेशव्दार येथे बांधण्यात येत आहे. या गार्डनमध्ये आकर्षक पाथवे बांधण्यात येत आहे. शांत आणि मंगलमय वातावरण व्हावे म्हणून येथे मंदिरे उभारण्यात येत आहे. लहानमुलासाठी खेळण्यासाठी उच्चदर्जाच्या साहित्याची उभारणी येथे होणार आहे. आकर्षक लॉन, प्लाम कोर्ट, जॉगींग ट्रॅक, गॅझेबो, खेळाचे मैदान, बहूउददेशीय व्यासपीठ व लॉन, विश्राममंडप, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासह आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत. येथील बागेची आकर्षक मांडणी होणार आहे.
सदरील गार्डनचे काम ठरवून दिलेल्या अराखडा प्रमाणे दर्जेदार पध्दतीने वेळेत पूर्ण करावेत, दर्जा बाबत कुठलीही तडजोड करू नये, संबंधित यंत्रणेने कायम लक्ष ठेऊन हे काम पूर्ण करावे, हा प्रकल्प पथदर्शी ठरावा यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी अशा सुचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या भेटी दरम्यान केल्या आहेत.
----
वृक्षतोड न करता सदया आस्तीत्वात असलेल्या
वृक्षांना नियोजनात समावीष्ट करावे
अत्यंत आकर्षक पध्दतीने उभारण्यात येत असलेल्या सर्व सोयीसुवीधांनी परीपूर्ण ठरणाऱ्या रविंद्रनाथ टागोर गार्डनचे काम करतांना त्या ठिकाणची वृक्ष तोडू नये, सध्या आस्तीत्वात असलेली वृक्ष नियोजनात घेऊन त्यांनाच आकर्षक आकार दयावा आदी सुचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या प्रसंगी दिल्या आहेत.
सदरील कामात कोणत्याही प्रकारची वृक्षतोड होणार नाही याची पूरेपूर काळजी घेतली जाईल असे महापालीका आयुक्त अमन मित्तल यांनी आमदार देशमुख यांना यावेळी सांगतिले. एखादे वृक्ष खुपच नियोजित कामाच्या मधोमध येत असल्यामुळे काढावे लागले तर त्या ठिकाणी नवीन ५ वृक्षांची लागवड केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.  
यावेळी मनपा आयुक्त अमन मित्तल, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता रोहन जाधव, शाखा अभियंता अनिल जांभळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता नवनाथ केंद्रे, पुणे येथील वास्तुविशारद श्री महेश नामपूरकर यांच्या संकल्पनेतून या बागेचे सुशोभीकरण करण्यात येत आहे, कंत्राटदार प्रमोद बल्लाळ, मुकेश जाधव मनपा क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, मनपा शाखा अभियंता प्रेमनाथ घंटे, माजी नगरसेवक रविशंकर जाधव, आयुब मणियार कैलास कांबळे, सिकंदर पटेल, खाजाबानू अन्सारी, दगडूसाहेब पडीले, प्रा.प्रवीण कांबळे, केशरबाई महापुरे,  अकबर माडजे, विष्णुदास धायगुडे, पवन सोलंकर, अभिषेक पतंगे, बालाजी झिपरे  आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच रविंन्द्रनाथ टागोर परिसरातील नागरीक उपस्थित होते.
--

Post a Comment

أحدث أقدم