वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी

 वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी



मुखेड/प्रतिनिधी:
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी महसूल सज्जातील मौजे बाप शेटवाडी अंतर्गत बापशेठवाडी व तोंडार तांडा येथील कारखाना रोडच्या दक्षिणेकडे कृष्णवाडी रोडच्या उत्तरे कडील परिसरातील राखीव वन विभागाच्या जमिनीवरील भुपान क्रमांक 785, 973, 1219 एकूण क्षेत्र ६३२ हेक्टर जमिनीवरील विविध प्रकारची अतिक्रमण काही अडदांड व गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केले आहे तसेच लगतच्या शासकीय गायरान जमिनीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे गायरान व राखीव वन जमिनीवर जनावरे चराई, झाडे कटाई, जमीन उकरणे, अवजारे लागवडी करणे, कोठे, शेततळे, दगडी बांध व इतर प्रकारची अतिक्रमण करून व झाडे तोडून आतोणात मोठ्या प्रमाणावर राखीव भूखंड हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे वन जमिनीच्या नुकसानीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे त्यामुळे वनाचे संरक्षण होत नाही अशी तक्रार अन्याया अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या सह मुखेड तालुक्यातील पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे मुखेड तहसीलदार यांना निवेदन दिले व या तक्रारीची तात्काळ जर दखल घेतली नाही तर 16 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे

Post a Comment

أحدث أقدم