केशवराज विद्यालयात वैयक्तिक भक्तिगीत गायन स्पर्धा
लातूर /प्रतिनिधी:विद्यार्थ्याचा शारीरिक,मानसिक,बौद्धिक, कलात्मक आणि वैज्ञानिक असा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात कलोपासक मंडळाच्या वतीने इयत्ता आठवी ते दहावी विभागात वैयक्तिक भक्तीगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत निवडक २० विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.त्यांना ४ विद्यार्थ्यांनी तबला साथसंगत केली.
मनोरंजक व संस्कारक्षम अशा या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक संदीप देशमुख, बबन गायकवाड,कार्यक्रम प्रमुख संतोष बीडकर,कलोपासक मंडळ प्रमुख सुनिता बनसुडे,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख शैलजा देशमुख व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق