युवकांनी तयार केलेल्या “ ऑक्सिजन २ ” शॉर्ट फिल्म पोस्टरचे
माजी मंत्री आमदार देशमुख यांच्या हस्ते
अनावरण
लातूर प्रतिनिधी-
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या बाभळगाव निवासस्थानी लातूर जिल्ह्यातील युवकांनी तयार केलेल्या पर्यावरणाशी निगडित “ऑक्सीजन २” शॉर्ट फिल्म पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी “ऑक्सीजन २” शॉर्ट फिल्म तयार केलेल्या सर्व टीमचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी “ऑक्सीजन २” शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक कुलदीप कांबळे, वंदेमातरम संघटना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख - अमोल जगताप, ग्राफिक डिझायनर हनमंत पिटले, सहकारी कलाकार राहुल स्वामी, कृष्णा धपादुळे आदी उपस्थित होते.
إرسال تعليق