एस.सी. एस.टी. घटकांसाठी उच्च शिक्षणांसाठी शिष्यवृत्ती

             एस.सी. एस.टी. घटकांसाठी उच्च शिक्षणांसाठी शिष्यवृत्ती

        लातूर- समाज कल्याण विभाग जि.प. लातूर यांच्यामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात मागासवर्गीयांसाठी जि.प. 20 टक्के सेस या योजनेअंतर्गत व्यवसायीक अभ्याक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांना शिष्यवृती अपुरी पडत असल्यास अर्थसहाय्य (व्यवसायीक अभ्यासक्रमाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी आर्थिक सहाय्य JEE/CET/NEET/IIT) योजने मधून JEE/IIT सुपर 30 बॅच करीता अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहु नये त्यांची ईच्छित अभ्यासक्रमास प्रवेश घेवून उच्च शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टीने ग्रामीण भागातील व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांना मिळत  असलेली शिष्यवृती अपुरी पडते.

            त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून  ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील  असावा.,लाभार्थी हा  दहावी मध्ये 85 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेवून उर्तीण झालेला असावा.

           शासन मान्यता प्राप्त महाविद्यालयात इयत्ता अकरावी (PCM) मध्ये शिक्षण घेवून आभियांत्रीकी व आय आय टी ची तयारी करण्यासाठी प्रवेशित असावा. लाभार्थ्याचे अर्जासोबत पालकाचे उत्पंन्न प्रमाणपत्र रुपये 95 हजार, जातीचे प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. त्याच बरोबर या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी लातूर शहरातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

          तरी सदर योजनेमधील पात्र विद्यार्थ्याची (Short Listed) तयार करुन मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल. तरी वरील योजनेचे अर्ज मागविण्यात येत आहेत.  सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यानी घ्यावा असे अवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

           योजनांचे अर्ज  माहिती पत्रकासह सर्व पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रासह दि. 10 सप्टेंबर 2022 पर्यंत सदर योजनेचे अर्ज पंचायत समिती यांच्याकडे सादर करावे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

            या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची समस्या उदभवल्यास समाज कल्याण विभाग जि. प. लातूर  (0238255092) या नंबर वर संपर्क साधावा. त्याचबरोबर सदर योजनेची माहिती जिल्हा परिषद, लातूर यांच्या www.zplatur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم