वैश्य बँकेस सर्वोत्कृष्ट बँक २०२२ चा प्रथम पुरस्कार
लातूर, प्रतिनिधी-वैश्य नागरी सहकारी बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशन लि,मुंबई वतीने सर्वोत्कृष्ट बँक 2022 प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे २३ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात होणार आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी बँकाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशन लि,मुंबई च्यावतीने दरवर्षी पुरस्कार प्रदान केला जातो. वैश्य नागरी सहकारी बँकेला जाहीर झालेला पुरस्कार हा रु.100 ते 500 कोटी ठेवी असलेल्या गटात सर्वोत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार सन 2021-2022 करीता प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष सुधाकर चिद्रवार व संचालक मंडळाने सभासद, ग्राहक, ठेवीदार यांचे आभार व्यक्त केले आहे.
إرسال تعليق