महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती

महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती 
 

औसा प्रतिनिधी- गणेश उत्सवाच्या निमित्ताने येथील केसरी या महिला मंडळ व श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर जिर्णोद्धार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास औसा विधानसभा मतदार संघाचे आ.अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ.शोभा ताई पवार यांच्यासह शेकडो महिलांनी हातात आरतीचे ताट व विशिष्ट रंगाच्या साड्या परिधान करून अथर्वशीर्ष पठण व महाआरती मध्ये सहभाग नोंदविला. अथर्वशीर्ष पठण व महाआरती कार्यक्रमांमध्ये रत्ना साडी सेंटर यांच्यावतीने प्रथम महाराजा कलेक्शन यांच्यावतीने द्वितीय आणि आरंभ प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या वतीने तृतीय पारितोषिक आयोजित करण्यात आले होते.
सलग 21 अथर्वशीर्ष पठण करणाऱ्या विजेत्या महिलांना 3001 रुपयाची पैठणी प्रथम ,2001 रुपयाची पैठणी द्वितीय आणि 1001 रुपयाची पैठणी तृतीय पारितोषिक म्हणून विजेत्या महिलांना देण्यात आले. महिलांच्या अथर्वशीर्ष पठण व महाआरती कार्यक्रमात शहरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सर्व महिलांनी स्वतःच्या घरून आरतीचे ताट सोबत आणून महाआरती कार्यक्रमांमध्ये अत्यंत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केसरी या महिला मंडळ केसरी या मित्र मंडळ व श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर जीर्णोद्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم