शब्दांकित साहित्य मंच लातूर आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रम

 

शब्दांकित साहित्य मंच लातूर आयोजित पुस्तकावर बोलू काही या उपक्रम




लातूर-स्व. निर्मला उत्तरेश्वर मठपती, सोलापूर यांच्या चरित्रात्मक साहित्यावर चर्चा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा.नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन' यांनी शब्दांकित साहित्य मंचाच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकला. वैविध्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बबन शिंदे,कळमनुरी (प्रसिद्ध लेखक) प्रमुख उपस्थिती मा. उत्तरेश्वर मठपती, सोलापूर, मा. अंजली स्वामी, सोलापूर हे होते.त्यांनी भावनांनी अोथंबलेले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अंजली स्वामी यांचे डोळे पाणावले. प्रमुख वक्त्यांनी निर्मला मठपती यांच्या चरित्रात्मक साहित्य कृतीवर भाष्य केले. विजयाताई भणगे यांनी  कल्पना चावलाचे चरित्र मुलींसाठी स्फूर्ती दायी ठरलेले असून आज मुली संशोधनाबरोबरच पायलट होण्यासाठी सहभागी होत आहेत असे मत व्यक्त केले.
शैलजा कारंडे यांनी गाडगे बाबांनी कुठल्याही विद्यापीठात जाऊन डिग्री घेतलेली नव्हती पण ते लोकांना सांगायचे हातातलं ताट विका.हातावर भाकरी घेऊन खा पण पोराले शिकवा, असे विचार मांडले.
 प्रा.डॉ.सुरेखा बनकर यांनी बाल साहित्य डोळसपणे लिहिले पाहिजे,अशी दिशा दिली.
उषा भोसले यांनी कर्तबगार स्त्रियांच्या चरित्रांना नव्याने उजाळा देण्याची गरज आहे,असे मत मांडले.प्रा.डॉ.प्रभा वाडकर यांनी बालसाहित्यासाठी लिखाण नीरक्षीर वृत्ती, पुराण कथा, अवतारी पुरूष असं ठसवण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवून लिखाण व्हावे असे विचार मांडले.विमल मुदाळे यांनी राष्ट्र निर्मितीच्या कार्यात भारत मातेचे अनेक तेजस्वी रत्न ज्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करताना प्रसिद्ध लेखक बबन शिंदे यांनी किशोरवयीन मुलांना त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी नाविन्यपूर्ण कथा,साहसी,गुढ कथा वाचायला मुलांना आवडतात त्यादृष्टीने लिखाण व्हायला हवे, असे विचार मांडले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - प्रा.डाॅ.मीना घुमे यांनी केले. उत्स्फुर्त प्रतिक्रिया सारिका कोरे यांनी दिली. याप्रसंगी कोकण पश्चिम महाराष्ट्र मधून साहित्यिकांची उपस्थिती होती. प्रसिद्ध लेखिका श्रुती वडकबाळकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमतीताई जगताप ,कैलास दौंड,अशोक कुबडे, उमा कोल्हे,  आशा पाटील, अनंत सूर, अरुणा चौधरी, अविनाश मठपती, दगड आप्पा गुडप, नीलिमा मानगावे,सुलक्षणा सोनवणे, आशालता बिराजदार, शुभम वाकडे,  सुरेश गीर सर,सुर्यकांत घेवारे सर, सुवर्णा गुंड, डॉ.क्रांती मोरे, शीला कुलकर्णी, निलिमा देशमुख,डॉ.सचिन प्रयाग, कांचन गीर, राधा गीर, तानाजी भोसले .साहित्य प्रेमी, लेखक,वाचक, रसिक श्रोते उपस्थित होते. आभार वृषाली पाटील यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم