कव्हा येथील विभागीय स्टेडीयमच्या कामाला गती द्यावी
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-मराठवाड्यासाठीचे विभागीय स्टेडीयम लातूरला करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला, जमिनीची मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्याकडे केली, त्यामुळे लातूर तालुक्यातील कव्हा ग्रामपंचायतीने ठराव घेवून तब्बल 23 एकर जमीन विभागीय स्टेडीयसाठी दिली त्या स्टेडीयमचे कामही सुरु झाले पंरतु राजकीय हस्तक्षेपामुळे सदरील काम बंद करण्यात आले. त्यामुळे त्या विरोधात मा.हायकोर्ट औरंगाबाद येथे निळकंठराव पवार यांच्या नावे रीट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मा.हायकोर्टाने कव्हा येथील विभागीय स्टेडीयमचे काम तत्काळ सुरु करून या संबंधी झालेल्या सर्व कामाचा अहवाल दर तीन महिण्याला द्यावा असे न्यायालयाने आदेशीत केल्यामुळे विभागीय स्टेडीयमच्या कामाला गती देवून हे काम प्रगतीपथावर करून घ्यावे. अशी मागणी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी नूतन क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
क्रीडा संचालक मोरे यांच्यासोबत माजी आ.कव्हेकरांची बैठक
विभागीय उपसंचालक मोरे यांच्यासोबत बैठकीमध्ये माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. विभागीय स्टेडीयमच्या कामामध्ये स्विमींग टँक, स्टेडीयम, हॉस्टेल, महिला व पुरूषासाठी विविध खेळांचा समावेश आहे. यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. विभागीय स्टेडीयम महाराष्ट्रामध्ये सर्व सुविधायुक्त व स्मार्ट व्हावे या कामी मा.जिल्हाधिकारी व इतर सर्वांचे सहकार्य आहे. त्यामुळे या कामाला गती द्यावी अशी भूमिकाही कव्हेकर यांनी यावेळी या बैठकीत बोलताना मांडली.
إرسال تعليق