लातूर जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीकरिता 290 कोटीपेक्षा अधिकची मदत जाहीर

लातूर जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीकरिता 290 कोटीपेक्षा अधिकची मदत जाहीर
 
लातूर-  लातूर जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार 71 शेतकऱ्यांना शेतीपिकांचे बाधित क्षेत्र  3 हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी 2 लाख 13 हजार 251 क्षेत्रासाठी 290 कोटीपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रचलित दर दोन हेक्टरच्या मर्यादेत रुपये 6 हजार आठशे होता, मदतीचे वाढीव दर तीन हेक्टरच्या मार्यादेत रुपये 13 हजार 600 असणार आहे. 
जिल्ह्यात अतिवृष्टी -पूर बाधित शेतकरी 52 हजार 106, बाधित क्षेत्र 27 हजार 434.53 , प्राप्त निधी 37 कोटी 34 लाख 27  हजार. गोगलगाय प्रादुर्भाव बाधित शेतकरी 95 हजार 591, बाधित क्षेत्र 68 हजार 385  प्राप्त निधी 93 कोटी 36 हजार तर सततचा पाऊस यामुळे बाधित शेतकरी 3 लाख 42 हजार 071 बाधित क्षेत्र 2 लाख 13 हजार 251 प्राप्त निधी 290 काटी 2 लाख 14 हजार  इतका निधी प्राप्त झाला आहे.  
जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने देण्याबाबतचा महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक : सीएलएस-2022/प्र.क्र.299/म-3, दिनांक 13 ऑक्टोबर, 2022 रोजी पारीत करण्यात आला आहे. 
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहीत दराने मदत देण्यात येते. 
राज्यात जुलै, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि. 10 ऑगस्ट, 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन शासन निर्णय महसूल व वने विभागाचा दि. 22 ऑगस्ट, 2022 अन्वये जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

Post a Comment

أحدث أقدم