आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती हासाळ्यात साजरी

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती हासाळ्यात साजरी



 औसा (प्रतिनिधी)- तालुक्यातील  हासाळा येथे कोळी बांधवांच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन संतोष भाऊ सोमवंशी उपसभापती  महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांच्या हस्ते करून साजरी करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे कार्य तपसर्या प्रेरणा देणारी असून त्यांनी हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण  लिहले जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी बालपणीच पळवून नेले त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि नंतर त्यांचे नाव वाल्या पडले सर्व लोक त्यांना वाल्या कोळी म्हणू लागले एकदा वाल्मिकीजी तपश्चर्यला बसले होते त्यांच्या शरीराला वाळवी लागली पण त्यांनी तपश्चर्यत भंग न आणू देता अध्यात्मिक साधना सुरू ठेवली म्हणून ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले 
वेळी उपसरपंच भुजंग पाटील, संजय पाटील, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, विलास पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, दिपक पवार, महादेव सारगे, सोमनाथ सारगे, संजय सारगे, लालासाहेब बोंबीले, अनिल सारगे, बाबुराव सारगे, सुरेश पाटील, रवींद्र पाटील, आदि सह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم