जे.जी.सगरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
लातूर : बोरी शिक्षण प्रसारक मंडळ व मियाँसाहब शैक्षणिक व सेवाभावी संस्थेचे सचिव तथा लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीचे सर्वेसर्वा जे.जी. सगरे यांना शिक्षण व सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अ?ॅन्ड एज्युकेशनल फाऊंडेशनच्या वतीने तेलंगणा प्रदेश शाखेतर्फे नुकतेच हैद्राबाद येथे राष्ट्रीय शिक्षण सेवा गौरव पुरस्कार-२०२२ देवून सन्मानीत करण्यात आले.
तेलंगणा राज्याचे केबिनेट गृहमंत्री महंमद महेमूदअली यांच्या हस्ते व मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. चंद्रय्याजी, आविष्कार फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय भोसले यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन विंजामारम निरजा यांनी केले तर आभार सुंदरैय्या गुरुगुल्ला यांनी मानले. बोरी शिक्षण प्रसारक मंडळ व मियाँसाहब शैक्षणिक व सेवाभावी संस्थेंतर्गत तीन प्राथमिक, तीन माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक विद्यालये चालतात. या संस्थेंतर्गत दीडशे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच सहकार क्षेत्रातील लातूर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या १० शाखांतर्गत दीडशे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
या पुरस्काराबद्दल शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, माध्यमिक विभगाचे शिक्षणाधिकारी गणेश मापारी, प्राथमिकच्या जिल्हाधिकारी वंदना फुटाणे, रामदास पवार, प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्रा. गोविंद घार, वसंतराव पाटील, बाबुराव जाधव, प्रकाश देशमुख, पी. एन. बंडगर, प्रा. ओमप्रकाश साकोळकर, मधुकर पात्रे, दगडुसाहेब पडिले, बोरीचे उपसरपंच शंकर पाटील, एकनाथ केजकर यांच्यासह संस्था व बँक अंतर्गतचे संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सगरे यांचे अभिनंदन केले.

إرسال تعليق