नवीन शैक्षणिक धोरण संकल्पना, संधी आणि आव्हाने या विषयावर नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांचे व्याख्यान

 नवीन शैक्षणिक धोरण संकल्पना, संधी आणि आव्हाने या विषयावर

नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांचे  व्याख्यान
लातूर -जेएसपीएम शिक्षण संस्थेच्यावतीने भारत सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण-2020-संकल्पना संधी आणि आव्हाने या विषयावर नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत, विज्ञान साहित्यलेखक डॉ. पंडीत विद्यासागर यांचे व्याख्यान 13 ऑक्टोबर 2022 आज रोजी दूपारी 04 वाजता विवेकानंदपूरम येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे.
भारत सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या मसूद्यास मान्यता दिली आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले. नवीन शैक्षणिक धोरण हे तब्बल 35 वर्षानंतर देशात लागू होत आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापासून शिक्षणात होऊ घातलेले बदल या शिक्षण धोरणाने अंमलात येणार आहेत. या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसूदा, त्यातील तरतूदी, विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संधी आणि अंमलबजावणीतील अडथळे यावर सांगोपांग मंथन या व्याख्यानामध्ये होणार आहे.
या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित  राहणार आहेत तर जेएसपीएम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला लातूर शहरातील शिक्षणप्रेमी, विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जेएसपीएम शिक्षण संस्थेने समन्वयक संचालक निळकंठराव पवार, प्रा.सतीश यादव, प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم