जिल्हास्तरावर एकदिवसीय प्रशिक्षणशिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन


 जिल्हास्तरावर एकदिवसीय प्रशिक्षण

शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन



          लातूर :-  लातूर जिल्हयात महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रचार व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला असून दुसरा टप्पा-जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनऔसा रोडलातूर येथे करण्यात येत आहे.

                या यात्रेमध्ये जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थीनवउद्योजक व नागरीकांनी सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.msins.in किंवा https://www.mahastartupyatra.in  वर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर सहायक आयुक्त यांनी केले आहे.

    राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यतापूर्ण स्टार्ट अप धोरण 2018 जाहीर करण्यात आले आहेसदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहेसदर धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्ट-अप्स परिसंस्थेच्या विकासाकरिता पोषक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तारगुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्यग्रँड चॅलेंजस्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतेसन 2022-23 या वर्षात राज्यातील नागरिकांच्या नव संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी विभागामार्फत दि.15 ऑगस्ट, 2022 ते  ऑक्टोबर, 2022 या कालावधी दरम्यान महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

      महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे (स्टार्टअप यात्रा) ठळक वैशिष्टये पूढीलप्रमाणे- महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणेनवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहनतज्ज्ञ मार्गदर्शननिधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणेराज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणेमहाराष्ट्रातील नाविन्यपूर्णकल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.

           स्टार्टअप यात्रेचे प्रामुख्याने 3 टप्पे :- तालुकास्तरीय प्रचार प्रसिध्दी व जनजागृती अभियान, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र(Boot Camp and Pitching Session) राज्यस्तरीय अंतिम सादरीकरण सत्र व विजेत्यांची घोषणा(Final Pitching Session and Grand Final)

             जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र(Boot Camp and Pitching Session) सर्व तालुक्यांत प्रचार प्रसिध्दी नंतर दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी जिल्हास्तरावर एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन केले जाईलप्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्रस्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेततसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

          या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपायकृषीशिक्षणआरोग्यकचरा व्यवस्थापनस्वच्छ पाणीऊर्जा-प्रशासनस्मार्ट पायाभूत सुविधा ‍आणि गतिशीलताअशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी दिली जाईलजिल्ह्यामधून पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणास अनुक्रमे रुपये 25 हजार,रुपये .15 हजार  व रुपये 10 हजार पारितोषिक मिळणार आहेतसेच सर्वोत्तम 10 (अव्वल 3 पकडूनसहभागींना राज्य स्तरावर सादरीकरणाची संधी भेटेल.

Post a Comment

أحدث أقدم