औसा प्रतिनिधी- धाराशिव (उस्मानाबाद) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार धाराशिव, कळंब विधानसभा मतदारसंघ कैलास दादा पाटील हे सलग पाच दिवस शेतकऱ्यांच्या पिकविमा, अनुदान, ओला दुष्काळ यासह विविध मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. यास महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी पाठिंबा दिला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा, खरीप हंगामात आलेले शेतकऱ्यांवरील संकट हा अतिसंवेदनशील विषय असून त्याची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार यावर ठोस कार्यवाही करत नाही, यावरूनच असंवेदनशील राज्य सरकारची बळीराजा प्रती किती आस्था आहे दिसून येते असे मत संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले .तरी त्यांच्या आमरण उपोषणात शिवसेना मा. जिल्हाप्रमुख लातूर तथा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती किशोर जाधव, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, धानोऱ्याचे सरपंच सुरेश मुसळे, उपतालुकाप्रमुख किशोर भोसले, विलास लंगर, संतोष सूर्यवंशी, आदी सह लातूर, औसा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
आ.कैलास पाटील यांच्या उपोषणास उपसभापती संतोष सोमवंशी यांचा पाठिंबा
www.swaranpushp.com
0
إرسال تعليق