लातूर- श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर या महाविद्यालयांमध्ये भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोंबर जन्मदिनानिमित्त "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत व्याख्याने, चर्चासत्र, अभिवाचन, सामूहिक वाचन ,ग्रंथ प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, कवी व लेखक श्री रमेश चिल्ले उपस्थित होते. प्रमुख आणि संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे ,सचिव श्री वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, संचालक श्री नंदकिशोर बावगे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य राजशेखर चौधरी, कादर शेख यांच्या हस्ते सरस्वती व डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी केले, "मराठी भाषेविषयी प्रेम ,प्रसार व प्रचार कराव "असे आव्हाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ.रमेश चिल्ले आपले मनोगत व्यक्त करत असताना माणसाला व्यक्त होण्यासाठी भाषा लागते "पुस्तके वाचल्यानंतर मस्तक सुधारते आणि मस्तक सुधारल्यावर नंतर कुठेही नतमस्तक होण्याची गरज भासत नाही "असे विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक भाषण केले. समाजात जीवन जगत असताना संवेदनशील असले पाहिजे, त्यांनी आपल्या साहित्यातून ग्रामीण जीवन आणि शेतकऱ्याचे जीवन रेखाटले. तसेच फार्मादर्शन या कार्यक्रमांमधील "लोगो आणि स्लोगन" स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे समारोप शिवानी कौलखरे तर सूत्रसंचालन रूपाली तपसाळे आणि अमृता माने यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق