लातूर (प्रतिनिधी) संतोष सोमवंशी जनसंपर्क कार्यालय लातूर, येथे औसा तालुक्यातील उटी (बू) ता. औसा हे गाव "आर. आर. पाटील स्वच्छ गाव सुंदर गाव" या योजनेत संपूर्ण लातूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे, उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
ग्रामीण भागातील इतर गावानीही उटी बु. गावातील कार्याचा आर्दश घेऊन आपले गाव सुंदर व आर्दश गाव बनवावे असे आवाहन संतोष भाऊ सोमवंशी यांनी केले
यावेळी उटी (बू) सरपंच भालचंद्र पाटील, उपसरपंच रफिक शेख, पोलीस पाटील जीवन अंधारे, चेअरमन श्रीपाद देशपांडे, व्हाईस चेअरमन दशरथ कांबळे, व सदस्य खालील प्रमाणे विनायक अंधारे, बळीराम शिंदे, चंद्रकांत भोकरे, रामदास बोजणे, तानाजी कांबळे, भागवत लोंढे, लक्ष्मण कांबळे, देविदास कांबळे, उटी (बू) देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विशाल देशपांडे, माधव सूर्यवंशी, वकील महेंद्र चव्हाण, राजू पाटील (सेलू), मनोज सोमवंशी (हिप्परसोगा), यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق