दुष्टाचा संहार करणारा नवरात्र महोत्सव- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 दुष्टाचा संहार करणारा नवरात्र महोत्सव-  माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर    


लातूर-ब्रम्हदेवाच्या वरदानामुळे मस्तवाल झालेल्या महिशासूर राक्षसाने त्रिलोकामध्ये हाहाकार माजवला तेव्हा देव मानवाने रूद्रा मातेला प्रार्थना केली .त्यामुळे रूद्रा मातेने महिशासुराचा वध केला हे युध्द नऊ दिवस चालले त्यामुळे नवरात्र महोत्सव दूर्जनांचा नाश करून आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. आशा या पवित्र नवरात्री महोत्सवाला विनम्र अभिवादन करतो. असे भावपूर्ण उद‍्गार मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मजगे नगर येथील मंगळागौरी नवरात्र महोत्सव प्रसंगी व्यक्‍त केले. याप्रसंगी ह.भ.प.केशवदादा महाराज उखळीकर, ज्ञानेश्‍वर चाटे महाराज, नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, सुंदर पाटील कव्हेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना कव्हेकर साहेब म्हणाले की, भारत जगामध्ये अध्यात्माचा मानवतेचा महागुरू आहे. त्यामुळे भारताची प्रतिमा जगात आदर्शात्मक आहे. समाजामध्ये धर्मगुरू, राजनेता व गुरूजन यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण आदर्शात्मक असतो. त्यामुळे यांनी आपल्या भावनांचा त्याग करून प्रेरणादायी राहिले पाहिजे.
मी अध्यात्मावर, सुविचारावर प्रभावीपणे बोलतो म्हणजे चारित्र्यसंपन्‍न असतो असे नाही. त्यासाठी माझे आचार, विचार, उच्चार, आहार आणि आंगतविहार चांगले असतील तरच मी खरा सत्यवादी मानवतावादी ठरतो असे मतही माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी नवरात्र महोत्सवाप्रसंगी  व्यक्‍त केले.  प्रारंभी चाटे महाराज, आनंद कैले, पुरूषोत्तम चाटे यांनी कव्हेकर साहेबांचा शाल, पुष्पहार देवून सत्कार केला. यावेळी प्राचार्य शेटे सर, यांच्यासह भावी-भक्‍तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Post a Comment

أحدث أقدم