युवा सेनेने रक्तदान शिबिर आयोजित करून आ. कैलास पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवला
धाराशिव प्रतिनिधी- खरिप हंगाम सन 2020 च्या शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा व अनुदान तातडीने मिळावे यासाठी आमदार कैलास पाटील यांचे 6 दिवसांपासून उपोषण चालू आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणुन आज दि. 29 ऑक्टोंबर रोजी अनोखा उपक्रम राबवत युवा सेनेने रक्तदान शिबिर आयोजित करून मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान शिबीरात भाग घेत शिबीर पार पाडले.
शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचारानुसार जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत अत्यंत स्तुत्य व अभिनव उपक्रम राबवत जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची सेवा व्हावी या शुद्ध हेतूने रक्तदान शिबीरात रक्तदान केले. युवा सेनेचे कार्यकर्ते हे केवळ पक्षाचे कार्यकर्ते नसून ते शेतकरी पुत्र आहेत. शेतकरी हा जसा दाता असतो त्याचप्रमाणे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आपले दातृत्व दाखवले आहे.
إرسال تعليق