आनंदाचा शिधा या विशेष योजनेअंतर्गत सर्वसामान्यांची दिवाळी केली गोड- अजित पाटील कव्हेकर
लातूर -कोरोना काळात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशभर मोफत धान्य वाटप करण्यात आले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.एकनाथ संभाजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री आदरणिय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सामान्यांची दिवाळी गोड झाली. दिवाळी सणानिमीत्त राज्य शासनाच्या वतीने अंत्योदय, अन्नसुरक्षा व शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा पोहचत आहे. रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत प्रत्येकी 1 किलो रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून लाभार्थी नागरिकांस मिळत आहे.
आज माताजी नगर, पटेल नगर, हणमंत वाडी परीसरात योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नदाता शिधा किटचे वाटप करण्यात आले. या वाटपादरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला आहे. सदर लाभार्थ्यांकडून या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून समाधान व्यक्त करीत आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, सुभाषआप्पा सुलगुडले, बालाजी शेळके, सचिन शिंदे ,स्वस्त धान्य दुकानाचे संचालक टोंपे , संतोष जाधव , धिरज भैरूमे , राहुल सुर्यवंशी , रमेश काळे ,लता घायाळ,शिवा बिराजदार,कैलास आंबेगावे ,अजय कोटलवार , शमसु बागवान , इरफान बागवान, मुक्तार शेख , मोहसीन सय्यद ,हबीब लाला मेहताब सय्यद , महादेव पिटले ,प्रवीण जोशी, ईश्वर कांबळे , ईश्वर सातपुते ,उपस्थित होते.

إرسال تعليق