काँग्रेसचे नवे अध्यक्ष ‘मल्लिकार्जून खर्गे’
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी 9 हजार 800 जणांनी मतदान केले होते. खर्गे यांना 7 हजार 897 मते पडली. विरोधी शशी थरुर यांना 1072 हजार मते मिळाली. थरूर यांनी पराभवाचा स्वीकार करत खर्गे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
24 वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय बाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. अध्यक्षपदासाठी खर्गे आणि शशी थरुर यांच्यात निवडणूक झाली. त्यासाठी सोमवारी देशभरात मतदान घेण्यात आले होते. जवळपास 96 टक्के मतदान झालं होतं. 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली होती.
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या.

إرسال تعليق