गुणवत्तेच्या क्षेत्रात बौध्दिक संपदेच्या जोरावर जेएसपीएम संस्थेचे नावलौकिक - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 गुणवत्तेच्या क्षेत्रात बौध्दिक संपदेच्या जोरावर जेएसपीएम संस्थेचे नावलौकिक - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर-जगामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. परंतु अशा स्पर्धेच्या युगातही सर्वाधिक हुशार तरूण आपल्या भारत देशातील आहेत आणि सर्वाधिक बेकारीही आपल्याच देशात आहे. परंतु ही परिस्थिती आपल्या येथील शिक्षणपध्दतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षण स्वीकारून गुणवत्तेच्या क्षेत्रात बौध्दिक संपदेच्या जोरावर चौफेर प्रगती करून जेएसपीएम संस्थेचा नावलौकिक निर्माण केलेला आहे असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद आयटीआय कॉलेजच्यावतीने  पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर व गुणवंताच्या गौरव समारंभात बोलत हेाते. यावेळी जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर,व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी एस.बी.वाघमारे, शासकीय आयटीआय कॉलेजचे माजी प्राचार्य व्ही. के. गाडेकर, शासकीय आयटीआयचे उपप्राचार्य सुनिल जाधव, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार साखरे, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य संदिप पांचाळ, आयटीआय कॉलेजचे निर्देशक सचिन भातलवंडे, प्राचार्य शैलेश कचरे, प्राचार्य शिरीन मॅडम, प्राचार्य मनोज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जेएसपीएम संचलित आयटीआयचे 25 विद्यार्थी कॅम्पास मुलखातीद्वारे विविध कंपन्यामध्ये रूजू झालेले आहेत. तसेच स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजचेही अनेक विद्यार्थी राज्यभरातील विविध कंपन्यामध्ये लागलेले आहेत. जेएसपीएम संस्थेच्या तीस युनिटच्या माध्यमातून चौफेर शैक्षणिक प्रगती झालेली असून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाले की, नोकरीची संधी मिळवून देण्याचे कामही संस्थेच्या माध्यमातून केले जाते. अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित तेजस्वी तरूण घडविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते. गुजरात सरकारने शिक्षणामध्ये भगत्गितेचा समावेश करून विद्यार्थ्यांना अध्यात्मिकतेचे धडे देण्याचे काम केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातही शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये भगवत्गितेचा समावेश करावा. सध्या विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली असल्यामुळे नॅनो टेक्नॉलॉजी व रोबोटद्वारे अनेक कामे ऑनलाईन पध्दतीने सुरू आहेत. एकप्रकारे जगामध्ये बौध्दिक संपदेचे राज्य सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जग, देश व गावाला काय पाहिजे हे लक्षात घेवून वाटचाल करावी
चीनची लोकसंख्या दीडशे कोटीच्या घरात आहे. तरीही जगाला,देशाला, राज्याला व गावाला काय पाहिजे हे लक्षात घेवून चीनने वाटचाल केली असल्यामुळे या देशाची चौफेर प्रगती झाली. अमेरिकेचा जीडीपी 22 ट्रिलियन डॉलरवर गेलेला आहे तर भारताचा जीडीपी 3.5 टक्क्यावर गेलेला आहे. त्याच धर्तीवर देशाची प्रगती केल्यानंतर भारताचा जीडीपी 2024 मध्ये 7.5 टक्क्यावर जाईल. मोदीजींच्या माध्यमातून जगात भारत देशाची एक वेगळी प्रतिमा निर्माण झालेली आहे. जागतिक सर्वेक्षणामध्ये 43 टक्के जनतेने मोदींना  पसंती दिलेली आहे. तसेच 13 राष्ट्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल गौरव केला यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचाही समावेश आहे. त्यामुळे आपणही जग, देश आणि गावाला काय पाहिजे ही भूमिका लक्षात घेवून यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.विश्‍वकर्मा व सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विजतंत्री व तारतंत्रीमध्ये यश मिळवलेल्या सार्थक जाधव, प्रतिक कदम, विजय दिक्षीत, सय्यद अलफेरिया या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संदिप पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी मानले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी- एस.बी.वाघमारे

आयटीआयच्या माध्यमातून विजतंत्री, तारतंत्री, फिटर व डीटीपी हे कोर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकविले जातात. त्यामुळे या संस्थेमध्ये आयटीआचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी स्किल व प्रझेंटेशन करण्याची तयारी ठेवून वाटचाल करावी. या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे राज्यातील अनेक कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होईल. तसेच उद्योगामध्येही करीअर करण्याचे तंत्रज्ञान या आयटीआयच्या माध्यमातून दिले जात असल्यामुळे ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी असे प्रतिपादन व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी एस.बी.वाघमारे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم