महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना विद्यापीठाची मान्यता प्रदान
लातूर येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा माननीय कुलगुरू यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. त्या प्रित्यर्थ त्यांचा यथोचित सत्कार श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शिवशंकरप्पा बिडवे आणि सचिव मा. मन्मथप्पा लोखंडे यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पहार देऊन करण्यात आला यावेळी ॲड. धनंजय मिटकरी, माजी सिनेट सदस्य डॉ. अशोक मोटे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य बालाजी जाधव आणि स्टाफ सचिव कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे म्हणाले की, आपण महाविद्यालयात कार्य करताना सहकार्य व जबाबदारीने कार्य केल्यास महाविद्यालयाचा शैक्षणिक विकासाचा आलेख सतत उंचावत राहील. यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे म्हणाले की, आपल्या मनात जर दुर्दम्य इच्छा शक्ती असेल तर कुठलेही कार्य सकारात्मक पद्धतीने घडून येते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड यांना विद्यापीठाने दिलेली प्रभारी प्राचार्य पदाची मान्यता होय असे सांगून त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी अभिनंदनपर मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे म्हणाले की, एकीचे बळ तुका म्हणे, हेची फळ या व्यक्तीप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकजुटीने कार्य करावे तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने शैक्षणिक विकास साध्य करता येईल असे ते म्हणाले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड म्हणाले की, आपली भूमिका जर सत्यवादी असेल तर त्यावर आपण निष्ठेने ठाम राहून कार्य केल्यास त्याची यशस्वीता आपल्याला नक्की मिळते असे सांगून श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन प्रा. डॉ. बी. एम. गोडबोले यांनी केले तर आभार उपप्राचार्य संजय पवार यांनी मानले.
या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व समन्वयक , विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق