'भुकेचा सोहळा' संदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन

 
'
भुकेचा सोहळासंदिप कळंबे यांच्या गझल संग्रहाचे प्रकाशन



कशासाठी कुणाच्याही पुढे ना हात केले मी
भुकेचा सोहळा होता उपाशी साजरा केला

लहानपणापासून परिस्थितीचे चटके करीत प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जातप्रसंगी उपाशी पोटीफुटपाथवर रात्र काढली पण वाम मार्ग न धरतासन्मार्गावर चालत राहिलेल्या संदिप शंकर कळंबे यांच्या 'भुकेचा सोहळाया गझल संग्रहाचे प्रकाशन नुकतेच डोंबिवली येथे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य आणि मराठी अभिनेत्री मेघा विश्वास यांच्या करण्यात आले.
स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने दरमहा होणाऱ्या 'मराठी आठव दिवसया उपक्रमात अष्टगंध प्रकाशनाच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बालरोतज्ज्ञ डॉ सुहास चौधरीकवी-समीक्षक राजीव जोशीकल्याण सार्वजनिक वाचनालयाचे सचिवसाहित्यीक- रंगकर्मी भिकू बारस्करकवी अजित मालांडकरअनिस पत्रिकेचे संपादक उत्तम जोगदंडअनिस ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश देवरुखकरअनिस कल्याण शाखाध्यक्ष डॉ बसवंतशाहू शिक्षण मंडळाचे सचिव डॉ गिरीश लटकेरंगकर्मी श्रीरंग दातेसुरेश पवारदेवेंद्र शिंदेसीताराम शिंदेराजेंद्र वाघमारेसुधा पालवेप्रज्ञा वैद्यसीमा झुंजाररावमीना ठाकरेविजया शिंदेसुनील खांडेकरश्रीकांत पेटकरसाक्षी धोरण आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपली कविता जपणाऱ्या कवीचा हा पहिला गझलसंग्रह प्रकाशित करताना मनस्वी आनंद होतो आहे.
पोलादपूर तालुक्यातील ऐत्याहासिक उमरठ या गावचा आणि आता डोंबिवलीकर असलेला हा शायर मितभाषी आणि कलेच्या प्रांतात रमणारा आहे. संदीपने अवघ्या ३०-३२ वर्षांच्या आयुष्यात दूनियेचे रंग पाहिलेअनुभवले आणि ते पचवले केवळ आपल्या लेखणीच्या जोरावर. बालपणी आईवडिलांचे छत्र नसल्यात जमा झाल्यानंतर कविता आणि चित्रकला यांचाच आधार लाभलेल्या संदीपच्या आयुष्याच्या सोबतीला हा कवीता संग्रह यापुढच्या काळात दिशा देणारा ठरणार आहे असे उदगार गझलकार प्रशांत वैद्य यांनी याप्रसंगी काढले. अभिनेत्री मेघा विश्वास यांनी नितांत सुंदरदमदार आणि आशयघन शब्दकळा लाभलेला तरुण गझलकार आहे साहित्य विश्वात संदीपचे आणि या गझल संग्रहाचे जोरदार स्वागत होईल असे कौतुक केले. तर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने वैचारिक दिवाळी साजरी होते आहे असे टिव्ही कलाकार सुधाकर वसईकर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
जन्म अपुल्यांच्या धगीमध्ये जळाला
कोळसा होतानिखारा होत गेला...
घेतले नाही जवळ मजला कुणीही
मग मला माझा सहारा होत गेला...
या पंक्ती सादर करीत आपल्या मनोगतात भविष्याच्या वाटचालीचा वेध घेताना संदिप कळंबे म्हणालेभूक लागली म्हणूनभाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणूनभुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. हृदयातून येत असलेल्या काव्यप्रतिभेच्या भुकेच्या जोरावर मी गावापासून मुंबई पर्यंतच्या प्रवासातली पोटातली भूक मी सहन करू शकलो.
कार्यक्रमाचे संयोजक सुधीर चित्ते यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले तर केली. स्वररंग निर्मित "इये मराठीचीये नगरीआम्हां घरी नित्य दिवाळी!" हा मराठी संस्कृतीची मनोहारी अनुभूती देणारा अनोखा कार्यक्रम सादर झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला १०६ हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अवकाळी पावसाने पीडित शेतकऱ्यांसाठी उपस्थित रसिकांनी सढळ हस्ते जमा झालेली रक्कम नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

 

 


Post a Comment

أحدث أقدم